{"product_id":"कातरवेळ-by-shrikant-karlekar","title":"कातरवेळ   by Shrikant Karlekar","description":"\u003cp\u003eएखाद दुसर्‍या दिवसाच्या वास्तव्याकरता जमवून ठेवलेल्या वस्तू आणि बंद ठेवण्यासाठीच बांधलेलं ते घर बघून माझ्या मनात निष्कारण कालवाकालव झाली ! मागच्या पडवीचं दार बंद होतं. ते उघडलं की निश्चितच मागच्या परसात विहीर असेल. कदाचित अळूची नाहीतर केळीची झाडं असतील . कदाचित नसतीलही ! बहुदा नसतीलच .\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसकाळी दरवाजा उघडला असता तरी चाललं असतं. पण मी अनाहूतपणे दारापर्यंत चालत गेलो . दाराचा कोयंडा काढला आणि बाहेरच्या भणभणत्या वार्‍यानं मी उघडू पाहत होतो ते दार जोरानं माझ्याच अंगावर ढकललं ! त्या वार्‍यानं माझ्या हातातल्या कंदीलाची वात विझली आणि ती पडवी आणि ते घर अंधारानं गपकन गिळून टाकलं !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eक्षणभर मी तसाच थबकून , हबकून , किंचितसा घाबरून गेलो . त्या तेव्हड्या वेळात माझ्या नजरेला अंधाराची ओळख झाली . बाहेरच्या झिमझिमत्या प्रकाशात दिसणारा परिसर मी चाचपू लागलो . मला एकाएकी जाणवलं ते गूढ अस्तित्व आणि उंचच उंच माडांच्या रांगातून वाट काढीत येणारा समुद्राचा आसमंत पछाडून टाकणारा आर्त स्वर -----------!\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641916203306,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/705f_1024x1024_2x_08db1e34-7030-4321-925a-cbf2e40f770c.webp?v=1732963811","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b3-by-shrikant-karlekar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}