{"product_id":"aadhunik-marathi-sahitya-aani-samajikta-आधुनिक-मराठी-साहित्य-आणि-सामाजिकता-author-dr-mrunalini-shah-dr-vidyagauri-tilak","title":"Aadhunik Marathi Sahitya Aani Samajikta |आधुनिक मराठी साहित्य आणि सामाजिकता Author: Dr. Mrunalini Shah, Dr. Vidyagauri TIlak","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eआधुनिक मराठी साहित्याचा समकालीन सामाजिक स्थितिगतीशी अंत:स्थ आणि खोलवरचा संबंध आहे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eयामुळेच आधुनिक मराठी साहित्य आणि सामाजिकता यांचे आंतरसंबंध व आंतरक्रिया सुविहितपणे निरखून-तपासूनच या साहित्याचे आस्वादन व मूल्यांकन होऊ शकते. साहित्याचा सामाजिक अनुबंध लक्षात घेतल्याने ज्या मराठी समाजात अन् संस्कृतीत हे साहित्य निर्माण होते आहे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eत्यांवरही प्रकाश पडतो. स्वातंत्र्योत्तर काळाच्या खुल्या वातावरणात उद्भवलेल्या सामाजिक चळवळी\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eआणि त्यांचा साहित्यनिर्मितीवर पडलेला प्रभाव यामुळे साहित्याकडे आता केवळ\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘कलात्म निर्मिती’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eम्हणून न पाहता\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘एक सामाजिक -सांस्कृतिक घटना’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eम्हणून पाहाणे भाग आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eवरील दृष्टीनेच डॉ.मृणालिनी शहा व डॉ. विद्यगौरी टिळक यांनी\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘आधुनिक मराठी साहित्य आणि सामाजिकता’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eया ग्रंथाचे संपादन केलेले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eदिलीप चित्रे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअरुण टिकेकर,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eवसंत आबाजी डहाके,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eनागनाथ कोत्तापल्ले,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eजयदेव डोळे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहरिश्चंद्र थोरात,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eराजेंद्र व्होरा इत्यादी सतरा मान्यवरांचे लेख या पुस्तकात समाविष्ट आहेत. या अभ्यासकांचे हे चिंतन\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘आधुनिक मराठी साहित्य आणि सामाजिकता’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eया विषयाच्या विचारक्षेत्राला नवे परिमाण व नवी दिशा देणारे आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eमराठीच्या तसेच सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांना आणि सामाजिक चळवळीतील विचारवंतांना व कार्यकर्त्यांना हा ग्रंथ उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642191487274,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/AdhunikMarathiSahityaAniSamajikata-500x500_c21dd9b9-cad5-4a65-b22d-b98ca31a7b1c.jpg?v=1732967282","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/aadhunik-marathi-sahitya-aani-samajikta-%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a4%e0%a4%be-author-dr-mrunalini-shah-dr-vidyagauri-tilak","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}