{"product_id":"adiyugm-by-kunte-madhavi","title":"Adiyugm by Madhavi Kunte आदियुग्म","description":"\u003cp\u003eAdiyugm by Kunte Madhavi\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eशिवपार्वतीचं अद्वितीय प्रेम आणि सहजीवन, समाजासाठी, गरीबांच्या कल्याणासाठी, मानवजातीसाठी त्यांनी केलेलं अखंड कार्य, मानस क्षेत्र आणि भौतिक क्षेत्रातील त्यांचं संशोधन, दंपतीजीवनाचा त्यांनी निर्माण केलेला आदर्श, एकमेकांचं वेगळं कार्यक्षेत्र मंजूर करून, एकमेकांना सहकार्य करीत त्यांनी मानसिक एकत्वाची परमोच्च पातळी मांडली. हे सर्वच मला अपूर्वाईचं वाटलं. पार्वती स्त्री आहे, म्हणून ती कमी प्रतीची नाही. ती आपल्या इतकीच गुणवान, शक्तिवान आहे. बुद्धिमान आहे. ती उत्तम योद्धा, कुशल प्रशासक, कलानिपुण, अध्यात्मविद्याप्रवीण आणि भौतिक विचारसंपन्न होऊ शकते. स्त्री असल्याने प्रजननाची अधिक शक्ती तिच्याकडे आहे. वंशसातत्याची कर्ती करविती तीच आहे. या गोष्टींवर ठाम विश्वास असलेल्या शिवशंकरांनी पार्वतीला सर्व तऱ्हेच्या विद्या प्रदान केल्या. पार्वतीनेही त्यांचा विश्वास सार्थ ठरविला. ते एकजीव असून स्वतंत्र होते. त्यांना मालकी हक्क दास्यत्व, मत्सर या गोष्टी प्रेमाच्या विपरीत वाटत होत्या. शंकर आदिपुरुष आणि पार्वती आदिप्रकृती होती. आद्या होती. हे आदियुग्म सर्व जीवनसाथीदारांना आदर्शवत वाटावं असंच आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dimple Prakashan \/ Marathi","offer_id":49625770197290,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/61SX11RT4CL._SY385_3383dde4-31a7-4984-a5d6-1a5c2fd79a47.jpg?v=1732610848","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/adiyugm-by-kunte-madhavi","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}