{"product_id":"aitihasik-wade-va-gharani-by-sumit-dengale","title":"Aitihasik Wade Va Gharani by Sumit Dengale ऐतिहासिक वाडे व घराणी","description":"\u003cp\u003eछत्रपती शिवरायांचे सरसेनापती माणकोजी दहातोंडे ते शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव यांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळे यांच्यापर्यंतची मराठेशाहीतील काही वाडे आणि घराण्यांचा समावेश या पुस्तकात केला आहे.\u003cbr\u003eउत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील मराठेशाहीच्या काळातील अनेक प्रसिद्ध-अप्रसिद्ध वाडे आणि घराण्यांचा अभ्यासपूर्ण वेध घेणारा दस्तऐवज म्हणजे ‘ऐतिहासिक वाडे व घराणी’ हे पुस्तक.\u003cbr\u003eमराठेशाहीच्या वेगवेगळ्या काळातील, वेगवेगळ्या शासकांच्या पदरी असणारी, वेगवेगळ्या जाती-धर्माची घराणी यामध्ये आहेत.\u003cbr\u003eसरदार, शास्त्री-पंडित, शाहीर, वतनदार, पाटील-देशमुख, सावकार, आदिवासी समूहाचा नाईक इत्यादी घराण्यांचा आणि त्यांच्या वाड्यांचा माहितीपूर्ण वेध या पुस्तकात घेतला आहे.\u003cbr\u003eवाडे आणि त्यांचे स्थापत्य, त्यांचा संदर्भासहित इतिहास, स्वतः लेखकाने काढलेल्या दीडशेहून अधिक दुर्मिळ वस्तूंचे आणि वाड्यांच्या छायाचित्रांचा समावेश यात आहे.\u003cbr\u003eकाही प्रचलित दंतकथा, आख्यायिका, नातेसंबंध आणि परंपरा, वर्तमानातील वाड्यांची स्थिती, मन अस्वस्थ करणारे वास्तव आणि काही रंजक किस्सेही या पुस्तकाचे आकर्षण आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखकाविषयी :\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eसुमित डेंगळे हे युवा लेखक, मुक्तपत्रकार आणि इतिहास अभ्यासक आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपुण्यातल्या कोथरुडच्या MIT college मधून IT Engineering चे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून Communication and Journalism विषयात मास्टर्स केले आहे.\u003cbr\u003eमराठ्यांच्या इतिहासाचे अभ्यासक असून मोडी लिपीचे ते जाणकार आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळाचे आजन्म सभासद आहेत. आजवर काही नियतकालिकं, दृकश्राव्य माध्यमं यांच्या माध्यमातून लेखन.\u003cbr\u003eसध्या वडिलोपार्जित व्यवसायसमूहाचं ते काम पाहतात. तसचं मुक्तपत्रकारिता आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत. लेखनासह संपादनाचा अनुभव.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपुण्यात ज्यांच्या नावाने डेंगळे पुल आहे त्या पेशवाईतल्या सरदार त्रिंबकजी डेंगळे यांच्या घराण्यातील ते असून संगमनेर तालुक्यातील निमगांवजाळी या त्यांच्या मूळ गावात ते त्रिंबकजी डेंगळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आणि डेंगळे वाडा ‘हेरिटेज वॉक’ असे कार्यक्रम आयोजित करतात.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Sumit Dengale","offer_id":50212000268586,"sku":"Sumit Dengale","price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/AitihasikWadeVaGharani.jpg?v=1748322547","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/aitihasik-wade-va-gharani-by-sumit-dengale","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}