{"product_id":"akashatun-aalo-apan-by-rumi-ashwin-chitale-part-1-part-2-आकाशातून-आलो-आपण-रूमीच्या-निवडक-गझला-आणि-रुबाई-भाग-1-भाग-2","title":"Akashatun Aalo Apan by Rumi, Ashwin Chitale Part 1 \u0026 Part 2 'आकाशातून आलो आपण' रूमीच्या निवडक गझला आणि रुबाई भाग 1, भाग 2","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv class=\"x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eरक्स-ओ-समा, फिरणे, नाचणे :\u003c\/span\u003e\u003cbr class=\"html-br\"\u003e\u003cspan\u003e'रक्स' आणि 'समा' हे दोन शब्द फारसी शायरीमध्ये खूप वेळा वापरले जातात. खासकरून सुफी तत्त्वज्ञानाच्या शायरीमध्ये ‘रक्स- ओ - समाः' याला खूपच महत्त्व आहे. सुफी लोक जे स्वतःभोवती फिरतात त्याला ते ‘रक्स' म्हणतात. रक्ष म्हणजे नाच. पण त्यांच्या मते हा फक्त नाच नसून देवापर्यंत पोहोचण्याचा एक 'तरीका' आहे, मार्ग आहे. सुफी तत्त्वज्ञान बहुतांशी परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कमीत कमी साधनांचा वापर करताना दिसतात. त्यांची अशी मान्यता आहे की स्वतःभोवती फिरून जी गुंगी किंवा जी धुंदी चढते, त्या धुंदीमध्ये ते एका अवस्थेमध्ये जातात जिथे त्यांच्या मते सर्व काही एक असते. ‘समा’चा शब्दशः अर्थ आहे ऐकणं. उद, बासरी, तार, तंबूर, चंग याच्या तालावर हे सुफी स्वतःभोवती गिरक्या घेऊ लागतात. ही वाद्यं ऐकत त्या समाधी अवस्थेपर्यंत पोहोचणं म्हणजे ऐकणं, म्हणजेच 'समा.' भाषांतर करताना या नाचण्याला 'फिरणं', 'घुमणं', 'मदमस्त होणं' असे काहीसे समानार्थी शब्द वापरले आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Walden Publication \/ Rumi \u0026 Ashwin Chitale","offer_id":52334425932074,"sku":null,"price":820.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/AkashatunAaloApanbyRumi_AshwinChitalePart1_Part2_1_2.png?v=1787486459","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/akashatun-aalo-apan-by-rumi-ashwin-chitale-part-1-part-2-%e0%a4%86%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%b2%e0%a5%8b-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%a3-%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%95-%e0%a4%97%e0%a4%9d%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-1-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-2","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}