{"product_id":"anasakta-karmayogi-by-s-k-akshikar-अनासक्त-कर्मयोगी","title":"Anasakta Karmayogi by S. K. Akshikar अनासक्त कर्मयोगी","description":"\u003cp\u003e\"अनासक्त कर्मयोगी\" या चरित्राचे लेखक श्री श्रीकृष्ण केशव अक्षीकर हे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील शिक्षण विभागातून सहसचिव या सन्मान्य पदावरून सेवानिवृत्त झालेले राजपत्रित अधिकारी आहेत . ते एक चांगले ललित लेखकही आहेत . आजवर त्यांची ‘ कन्सल्टिंग रूम ‘ केशव अक्षीकर ‘ आदरांजली ‘ , ‘ अशी ( ही ) माणसं ‘ , ‘ माझ्या मनातलं ‘ व ‘ रिकामपणाचे उपद्व्याप ‘ ही पाच ललित पुस्तके प्रकाशित झालेली आहेत . त्यांनी एके काळी ‘ सुगत ‘ या नावाने वासंतिक व दिवाळी अंकांचे संपादनही केले होते . या चरित्राचे नायक कै . गो . ना . अक्षीकर यांचे ते नातू आहेत . टिळक – आगरकरांच्या अध्यापनाचा लाभ घेत त्यांच्याच ‘ राष्ट्रीय ‘ शाळेतून मॅट्रिक झालेल्या कै . गो . ना . अक्षीकरांनी आपल्या या गुरुद्वयाकडून शिक्षणप्रसाराचा संस्कार कसा घेतला ; दादर , ठाणे व कल्याण या एके काळच्या मागासलेल्या ‘ खेड्यां मध्ये सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी कशा शाळा काढल्या , त्या काळात शिक्षणक्षेत्रात दुर्मीळ असणाऱ्या ‘ रात्रशाळा ‘ व ‘ इंडस्ट्रियल स्कूल ‘ या संकल्पना कशा प्रत्यक्षात आणल्या , हे सर्व करीत असताना देणग्यांवर अवलंबून न राहता स्वत : च आर्थिक पदरमोड कशी केली , यश , कीर्ती , नाव आणि स्वतःचे छायाचित्रही यांपासून ते निष्ठेने कसे अलिप्त राहिले , यांचे एक हृद्य व प्रेरणादायी चित्र या चरित्रात पाहवयास मिळते . योगायोगाने कै . गो . ना . अक्षीकर सुवर्णजयंती वर्ष आणि त्यांनीच स्थापन केलेल्या दादर – मुंबईच्या छबिलदास शाळेची शतकोत्तर रजतवर्षपूर्ती या २०१४ त येणाऱ्या दोन मंगल मुहूर्ताच्या उंबरठ्यावर हे चरित्रपुस्तक प्रकाशित होत आहे . याच्या वाचनाने शिक्षणक्षेत्रातील मंडळींना कार्यऊर्जा प्राप्त व्हावी आणि विद्यार्थ्यांवर ध्येयासक्ती व अनासक्तीचा संस्कार व्हावा , हीच एक इच्छा .\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cem\u003e– डॉ . द . दि . पुंडे\u003c\/em\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ S. K. Akshikar","offer_id":49642096754986,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/AanasaktaKarmayogi-1-600x967_3ff033c1-484c-463e-be70-7b418e1a02af.jpg?v=1732965792","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/anasakta-karmayogi-by-s-k-akshikar-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}