{"product_id":"apurnankachya-khunanchi-katha-by-inoue-hisashi-mayuresh-kulkarni-अपूर्णांकांच्या-खुनांची-कथा-इनोउए-हिसाशी-मयुरेश-कुलकर्णी","title":"Apurnankachya Khunanchi Katha by Inoue Hisashi, Mayuresh Kulkarni अपूर्णांकांच्या खुनांची कथा - इनोउए हिसाशी, मयुरेश कुलकर्णी","description":"\u003cp\u003eअपूर्णांकांच्या खुनांची कथा - इनोउए हिसाशी  Inoue Hisashi\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभाषांतर : मयुरेश कुलकर्णी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदोन्ही काठांकडचा थोडासा भाग वगळता ओनिनाकी नदीवरचा तो पूल पूर्णपणे वाहून गेला होता. पावसापाण्याने पुलाजवळच्या त्या राक्षसांच्या काष्ठशिल्पांचीही भयानक अवस्था झाली होती. एका राक्षसाला पुराने अक्षरशः जमीनदोस्त करीत आसमान दाखवलं होतं. दुसऱ्या राक्षसाचा छातीपासून वरचा भाग तुटून गाळात रुतला होता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपलीकडच्या काठावर आपत्कालीन दलाच्या दोन गाड्या येऊन थांबल्या होत्या. ऐलतीरावरही ओनिनाकीतली पुरुष मंडळी गोळा झाली होती.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"आत्ता या क्षणी तरी काही करता येणं अशक्य आहे!\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउजव्या हातात कर्णा धरून पैलतीरावर उभ्या असलेल्या माणसाने इकडच्या लोकांना कळवलं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"उद्या सकाळी सातच्या सुमारास पुन्हा इथे जमाल का?\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपावसाच्या जोडीलाच आता वाऱ्यानेही जोर पकडला होता. कर्ण्यातून येणारा आवाज वाऱ्याने विस्कटून जात मध्येच खूप दुरून अन् मध्येच जवळून ऐकू येत होता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"सातला जमू, आणि मग काय करायचं, त्याचा निर्णय घेऊ !\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया काठावर उभ्या असलेल्या एकाने दोन्ही हात उंचावून कोपरात वाकवले, आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांना टेकवून 'ठीक आहे'ची खूण केली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Walden Publication","offer_id":52645522997546,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/rn-image_picker_lib_temp_fc8bebab-7381-49ff-bc0d-cb041be2146b.jpg?v=1789671391","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/apurnankachya-khunanchi-katha-by-inoue-hisashi-mayuresh-kulkarni-%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%96%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%89%e0%a4%8f-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}