{"product_id":"bandhavarachi-zade-by-dr-v-n-shinde-बांधावरची-झाडे-डॉ-व्ही-एन-शिंदे","title":"Bandhavarachi Zade BY Dr. V. N. Shinde बांधावरची झाडे डॉ. व्ही. एन. शिंदे","description":"\u003cp\u003eBandhavarachi Zade BY Dr. V. N. Shinde बांधावरची झाडे डॉ. व्ही. एन. शिंदे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eबोर, हादगा, जांभूळ, शेवगा, चिंच, आंबा, आवळा, कडुलिंब, बाभूळ, \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसाग या झाडांविषयीच्या ज्ञानललित माहितीचा लेखसंग्रह म्हणजे ‘बांधावरची \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eझाडे' हे पुस्तक.डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी जाणीवपूर्वक घडविलेला हा विज्ञानललित \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबंध आहे. झाडांच्या शास्त्रीय माहितीबरोबर त्यांचा व्याप्ती-पसारा, भूगोल, \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभाषिक संज्ञेचा वर्णपट त्यामध्ये निवेदिला आहे. त्यामुळे त्यास वस्तुनिष्ठ \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवैज्ञानिक माहितीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यासाठी त्यांनी विविध \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eज्ञानशाखांमधील माहितीचा भरगच्च आधार घेतला आहे. झाडांचा अधिवास\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eव परिसर विज्ञानाविषयीचे हे कथन आहे. त्यात शेतीज्ञानाबरोबर वनस्पतिविज्ञान \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआहे. त्या त्या झाडांची व्यावहारिक उपयोगिता सांगितली आहे. शिंदे यांच्या लेखनाचा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमहत्त्वपूर्ण विशेष म्हणजे झाडसृष्टीच्या मानवनिर्मित बांधकामाचे कथन. माणूस आपल्या \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकल्पनानिरीक्षणाने सृष्टिवाचन करत त्यास मानवी रंगरूप देत आला आहे. डॉ. शिंदे \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयांच्या लेखनात मानवाने आदिकाळापासून झाडांविषयीचे रचलेले विहंगदर्शन आहे. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलोककथा, गाणी, दंतकथा, मिथके व आधुनिक साहित्यातील ही झाडदर्शने आहेत. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलोक व लिखित परंपरेच्या झाडवाचनाचा त्यात धांडोळा आहे. एका अर्थाने मराठी \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंस्कृतीत उमटलेले झाडांचे हे बिलोरी रंगछायादर्शन आहे. डॉ. शिंदे यांच्या या \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eझाडवाचनाला लेखकाच्या आत्मपरतेचे गहिरे रंग प्राप्त झाले आहेत. त्यामुळे \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबांधावरील हे झाडमायादर्शन मनोहारी ठरेल. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- डॉ. रणधीर शिंदे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Marathi","offer_id":49625450479914,"sku":null,"price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/BandhawarchiZade_Cover-800x800_ef18c8cf-66c1-4b0e-8cc0-894a4770a3ec.jpg?v=1732603675","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/bandhavarachi-zade-by-dr-v-n-shinde-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%8f%e0%a4%a8-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}