{"product_id":"bharatiya-sanskruti-sane-guruji","title":"Bharatiya Sanskruti - Sane Guruji","description":"\u003cp itemprop=\"name\"\u003eBharatiya Sanskruti - Sane Guruji\u003c\/p\u003e\n\u003csection class=\"page-product-box\"\u003e\n\u003cdiv class=\"rte align_left\"\u003e\n\u003cdiv\u003e\u003cspan\u003eसाने गुरुजींनी भारतीय संस्कृतीबाबत केलेले चिंतन या पुस्तकात पाहावयास मिळते. भारतीय संस्कृती सर्व जातिधर्म, ज्ञानविज्ञान आणि सर्व काळाचा मेळ घालून वाढते. जगात जे जे काही चांगले आहे, ते ते बरोबर घेऊन, सर्वांना जवळ घेऊन प्रवाहित होणारी अशी ही भारतीय संस्कृती आहे असे साने गुरुजी म्हणतात. आजच्या काळातही त्यांचे विचार वाचनीय व मननीय आहेत. \u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cb\u003e\u003cspan\u003eलेखक साने गुरुजी यांच्याबद्दल \u003c\/span\u003e\u003c\/b\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan\u003eस्वातंत्र्यपूर्व काळात कोकणातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या साने गुरुजींनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर देशात सुरु असलेल्या सत्याग्रह चळवळीमध्ये सहभाग घेतला. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eस्वातंत्र्यासाठी त्यांनी तुरुंगवास भोगला. स्वातंत्र्य मिळाल्यावर सामाजिक विषमता नष्ट व्हावी या उद्देशाने पंढरपूरचे मंदिर सर्व जातीधर्मांसाठी खुले करण्याकरिता त्यांनी आमरण उपोषण केले. साधना साप्ताहिक सुरु करून त्यांनी आपले विचार जनतेपर्यंत पोचवले. त्यांनी तब्बल १३५ पुस्तके लिहिली. बहुसंख्य पुस्तके लहान मुलांसाठी असली तरी भारतीय संस्कृती, इस्लामी संस्कृती, अशा पुस्तकांमधून त्यांच्यातील विचारवंताचे दर्शन होते. \u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Sane Guruji","offer_id":49626269974826,"sku":null,"price":190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4581-thickbox_default_fcf7a37a-a26c-4c75-9115-b238d28c60cf.jpg?v=1732616653","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/bharatiya-sanskruti-sane-guruji","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}