{"product_id":"bhartiya-shilpavaibhav-by-dr-s-r-deshpande","title":"Bhartiya Shilpavaibhav By Dr. S R Deshpande भारतीय शिल्पवैभव","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e\"भारतीय वास्तुशिल्पशैलीतील काही निवडक आणि प्रातिनिधिक शिल्पवैभवाचा डॉ. सुरेश देशपांडे यांनी प्रस्तुत ग्रंथात सौंदर्याभिरुचीच्या रसठाहणात्मक दृष्टिकोनातून परिचय करून दिला आहे. ठाीको-रोमन शिल्पशैलीपासूनचे भारतीय शिल्पशैलीचे वेगळेपण, तिची वैशिष्ट्ये यांच्या मीमांसेबरोबरच गांधार, सांची, मथुरा, अमरावती, नागार्जुनकोंडा वगैरे बौद्ध शैलींचा प्रागतिक-वैकासिक आढावाही या ग्रंथात त्यांनी घेतला आहे. अजिंठा, वेरुळ व घारापुरी या गुंफा-समूहांची महती, खजुराहो-कोणार्क ही कामशिल्पांसाठी प्रसिद्ध असलेली स्थळे आणि यादव, शिलाहार व होयसळ या राजघराण्यांची कला यांचीही सोदाहरण चर्चा या ग्रंथात समाविष्ट आहे. विषयानुरूप निवडक छायाचित्रे आणि ओघवती भाषा यांमुळे हा ग्रंथ कलाप्रेमी तसेच शिल्पशास्त्राच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास वाटतो. \"\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ New \/ Marathi","offer_id":49653722841386,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/2411.jpg?v=1733158279","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/bhartiya-shilpavaibhav-by-dr-s-r-deshpande","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}