{"product_id":"bose-the-untold-story-of-an-inconvenient-nationalist-by-chandrachud-ghosh-marathi-बोस-एका-अस्वस्थ-करणार्‍या-राष्ट्रवादीची-न-सांगितलेली-कथा","title":"Bose: The Untold Story Of an Inconvenient Nationalist by Chandrachud Ghosh (Marathi) बोस- एका अस्वस्थ करणार्‍या राष्ट्रवादीची न सांगितलेली कथा","description":"\u003cp\u003eसुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्याइतकं नाट्यपूर्ण आणि साहसी आयुष्य दुसऱ्या कुठल्याच भारतीय नायकाचं नव्हतं. त्यांच्यासंदर्भात जे ज्ञात आहे, त्यावरून तरी असाच लेखाजोखा मांडला जातो. भारतीय नागरी सेवेतून राजीनामा देणं, स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून देणं, दोन वेळेस सात वर्षांहून अधिक काळ हद्दपार केलं जाणं, काँग्रेसमधील गांधींच्या नेतृत्वाला आव्हान देणं, ब्रिटिश सरकारविरुाद टोकाची जहाल भूमिका घेणं, युरोप आणि पुढे आग्नेय आशियात जाण्यासाठी नावाजलेल्या गुप्तहेर खात्याच्या हातावर तुरी देणं, दोन सरकारं स्थापन करणं, दोन सेना उभ्या करणं आणि त्यानंतर अज्ञातात नाहीसं होणं. 'बोस- (अडचण ठरणाऱ्या) एका राष्ट्रवादीची न सांगितलेली कथा' हा गतिमान शोधग्रंथ वाचायला घेतल्यावर पूर्ण झाल्याशिवाय खाली ठेवता येत नाही. तो विचारांना चालना देतो. त्याच्या पानोपानी तुम्हाला संदर्भ आणि तपशील सापडतील. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल आजवर अज्ञात असलेल्या, न सांगितल्या गेलेल्या कितीतरी कथा समोर आणतो. मराठीत प्रथमच सुभाषचंद्र बोस यांचे सविस्तर, साधार आणि संशोधनपर चरित्र.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"‎Hedwig Media House \/ Chandrachud Ghosh","offer_id":51150812152106,"sku":null,"price":1200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Bose_The_Untold_Story_Of_an_Inconvenient_Nationalist_by_Chandrachud_Ghosh.jpg?v=1770969582","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/bose-the-untold-story-of-an-inconvenient-nationalist-by-chandrachud-ghosh-marathi-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b8-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e2%80%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}