{"product_id":"breaking-the-god-delusion-by-vinay-kumar-ब्रेकिंग-द-गॉड-डिलूजन","title":"Breaking the god Delusion By Vinay Kumar  ब्रेकिंग द गॉड डिलूजन","description":"\u003cp\u003eदेव आहे का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविश्वाचं काही प्रयोजन आहे का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपण इथे का आहोत? सर्व काही योगायोगानं घडतं का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे प्रश्न सत्याच्या सर्व शोधकांना नेहमीच छळतात. आज आपण आधुनिक विचारसरणीच्या संकटाला सामोरे जात आहोत; कारण विज्ञानानं उपस्थित केलेल्या आव्हानांमुळे आपण देवाच्या संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या निष्कर्षांमुळे आपल्यापैकी अनेक जण नास्तिकता, अज्ञेयवाद आणि शून्यवादाच्या जाळ्यात अडकले आहेत. विशेषतः तरुण पिढीतील शास्त्रज्ञ अस्तित्वाचा उद्देश आणि सर्व गोष्टींमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविज्ञानातील गेल्या ३०० वर्षांतील जवळपास दोषविरहित प्रगतीमुळे विचारसरणीतील हे संकट निर्माण झालं आहे. बालपणापासून शिकवलेली देवाची संकल्पना आणि विज्ञानानं दिलेलं विश्वाचं आकलन, या दोन्हींमध्ये मेळ होत नाहीये. दृढ श्रद्धा असलेले लोकसुद्धा नास्तिकांनी मांडलेल्या केवळ तर्क आणि युक्तिवादामुळे गोंधळून जातात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया संकटातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? ‘ब्रेकिंग द गॉड डिलूजन’ हे पुस्तक श्रद्धा आणि विज्ञान यांच्यातील खुलासा करणारं आणि आकर्षक असं एक तुलनात्मक विश्लेषण आहे. आधुनिक मनासाठी लिहिलेलं हे पुस्तक आपल्या अस्तित्वाच्या द्विधा मनःस्थितीवर मात करण्याचा मार्ग दाखवतं. हे असं पुस्तक आहे, जे मनाला प्रेरणा देतं, हृदयाला स्पर्श करतं आणि आत्म्याला शांती देतं.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vishawakarama Publication \/ Vinay Kumar","offer_id":51208143438122,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Breaking-the-Gods-Delusion_Book-F.jpg?v=1772602406","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/breaking-the-god-delusion-by-vinay-kumar-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%a6-%e0%a4%97%e0%a5%89%e0%a4%a1-%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%82%e0%a4%9c%e0%a4%a8","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}