{"product_id":"chanakyaniti-by-vijaya-deshapande","title":"Chanakyaniti (चाणक्यनीती)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमगध देशाच्या नंद राजाच्या राजसत्तेचा सर्वनाश करून त्या जागी तीव्र बुद्धिमत्तेच्या शूर चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवणारे आचार्य विष्णुगुप्त चाणक्य हे कुशल राजनीतिज्ञ,आचार-विचारांचे मर्मज्ञ आणि कूटनीतीतील सिद्धहस्त म्हणून प्रसिद्ध आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअभिजात संस्कृत साहित्यातील नीतिपर चाणक्यनीती समाज, राजकारण, धर्म आणि कर्माविषयी मार्गदर्शन करते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्राचीन काळी लिहिलेल्या चाणक्यनीतीतील जीवनमूल्ये आजही तितकीच कालसुसंगत आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवर्तमान परिस्थितीचे भान ठेवून चाणक्यनीतीतील 325 सूत्रांवर केलेले हे भाष्य आधुनिक युगातील मानवासाठी पथदर्शक ठरते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअमृत, सुवर्ण, विद्या आणि गुण ग्रहण करण्यास कधीही संकोच करू नये.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमनी कल्पना केलेले काम तोंडाने सांगू नये. त्याचे गुप्त मंत्राप्रमाणे रक्षण करावे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eज्याप्रमाणे प्रत्येक पर्वतावर माणिक, पाचू प्राप्त होत नाहीत आणि सर्वच जंगलांत चंदन वृक्ष उपलब्ध होत नाहीत, त्याचप्रमाणे सज्जन लोक सर्व ठिकाणी भेटत नाहीत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमनन करणे, अध्ययन करणे आणि लोकांना मदत करणे ही मानवी जीवनातील अनिवार्य कर्तव्ये आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआचरणामुळे मनुष्याच्या कुळाचा परिचय होतो. भाषेमुळे देशाचा पत्ता लागतो. आदर-सत्कारामुळे प्रेमाचा तसेच व्यक्तीच्या देहाकडे बघून तो ग्रहण करत असलेल्या अन्नाचा परिचय होतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Vijaya Deshapande \/ Saket Publication \/ Marathi","offer_id":45039445737770,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/19_058d59df-c609-48ec-979e-eaff1e56cd6c.jpg?v=1685524738","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/chanakyaniti-by-vijaya-deshapande","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}