{"product_id":"chitrangan-चित्रांगण-author-dr-suhasini-irlekar-डॉ-सुहासिनी-इर्लेकर","title":"Chitrangan | चित्रांगण Author: Dr. Suhasini Irlekar|डॉ. सुहासिनी इर्लेकर","description":"\u003cp\u003eडॉ. सुहासिनी इर्लेकर यांची कविता स्वातंत्र्योत्तर कालखंडातील महत्त्वाची कविता मानली जाते. विविध वाङ्‌मयप्रकारात त्यांनी विपुल लेखन केले असले,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतरी त्यांचा मूळ पिंड कवयित्रीचाच होता. डॉ. इर्लेकर यांची कविता कधी अंतर्मनाचा वेध घेते तर कधी आपल्या अस्तित्वाचाच. कधी त्यांचे गहिरे मन आणि मौन बोलके होते,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतर कधी अंतर्मुख. कधी त्यांची कविता रोमँटिक स्त्रीकाव्याशी नाते सांगणारी,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतर कधी अध्यात्माला जवळ मानणारी. कधी सामाजिक आशय घेऊन येणारी,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतर कधी कोणत्याच मर्यादात न रमता मुक्त आकाशाचा वेध घेणारी आहे. अशा बहुविध रूपांनी सजलेल्या कवितांचे स्वागत रसिकांनी यापूर्वीच मनोभावे केले आहे.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘तृप्ती’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eह्या पहिल्या कविता संग्रहातील (१९६१) काही कविता,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतर २००१ ते २०१० ह्या काळात विविध नियतकांलिकांतून प्रसिद्ध झालेल्या कवितांचा हा संग्रह वाचकांना नक्कीच आवडेल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642180739370,"sku":null,"price":81.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Chitraangan-500x500_089cd69c-e1d0-45f3-942b-803d8425e4f9.jpg?v=1732967065","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/chitrangan-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a3-author-dr-suhasini-irlekar-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%87%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}