{"product_id":"cobalt-blue-by-sachin-kundalkar-कोबाल्ट-ब्लू-सचिन-कुंडलकर","title":"Cobalt Blue by Sachin Kundalkar कोबाल्ट ब्लू सचिन कुंडलकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकोबाल्ट ब्लू.. आपलं अस्तित्व अबाधित ठेवून, सरळ आकाशाशी, त्याच्या व्याप्तीशी सलगी करणारा हा रंग. कोबाल्ट ब्लू चा ‘हिरो‘ ही तसाच आहे.. तनय आणि अनुजासाठी पूर्णत्वाची ओळख घेऊन आलेला, चेतना जागवणारा, प्रेमाची ओळख करून देणारा, आकाशासारखा सगळीकडे सामावलेला.. तनय आणि अनुजा ह्या दोन सिबलिंग्जची ओळख ‘कोबाल्ट ब्लू‘ मुळे अर्थात ह्या तिसऱ्या निनावी हिरोमुळे आपल्याला होत जाते. ह्या नायकामुळे दोन भावंडांच्या आयुष्यात काय काय होतं आणि ही दोघं ह्या बदलाकडे कशा नजरेने बघतात ह्याची कथा म्हणजेच ‘कोबाल्ट ब्लू‘. बहीण–भाऊ म्हणून एकमेकांमध्ये आपुलकी असली तरी दोघंही एकमेकांच्या पर्सनल आयुष्यात काय चालुए या बाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. आई–वडीलही अगदी ‘ट्रॅडीशनल‘ विचारसरणीतले! त्यामुळे घरच्यांपाशी व्यक्त होण्याला खूप मर्यादा आहेत. ह्या दोघांच्या आयुष्याच्या कॅनव्हासवरचं त्यांचं हक्काचं स्वत:चं चित्र काही कारणांनी विस्कटतंय ह्याची स्वतंत्ररित्या जाणीव दोघांनाही आहे आणि नवा कॅनव्हास घेऊन पुढे जाण्याची.. त्यावर नवं चित्र रंगवण्याची उमेद दोघंही बाळगून आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mouj Prakashan Griha \/ Sachin Kundalkar","offer_id":50217291841834,"sku":null,"price":190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/CobaltBlue.jpg?v=1747899009","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/cobalt-blue-by-sachin-kundalkar-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%82-%e0%a4%b8%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}