{"product_id":"dadabhai-nouroji-by-nimbajirao-pawar","title":"Dadabhai Naoroji (दादाभाई नौरोजी) by Nimbajirao Pawar","description":"\u003cdiv id=\"short_description_block\"\u003e\n\u003cdiv id=\"short_description_content\" class=\"rte align_justify\" itemprop=\"description\"\u003e\n\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eअलोट देशभक्ती, पाश्चिमात्य शिक्षणाचे विवेकपूर्ण व साक्षेपी आकलन, हिंदुस्थानातील अंधश्रद्धाळू, अशिक्षित व दरिद्री बांधवांविषयी कळकळ या सर्व गुणांमुळे दादाभाईंचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या समकालीनांमध्ये व त्यांच्यानंतरच्या भारतीय नेत्यांमध्ये दीपस्तंभासारखे अढळ दिसते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eफक्त भावनेच्या लाटेवर स्वार होऊन हिंदुस्थानाची प्रगती साधता येणार नाही, हे ते जाणून होते. ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवर त्यांचा विश्वास होता. म्हणून सनदशीर मार्गांनी कायद्याचे राज्य हिंदुस्थानात आणण्यासाठी त्यांनी अथकपणे जवळ-जवळ सात दशके क्रियाशील राजकारण केले. ब्रिटिश साम्राज्यातील पार्लमेंट सभेसाठी त्यांची निवड ही एक खरोखर ऐतिहासिक घटना होती.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदादाभाईंपासून प्रेरणा घेऊन गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक, उमेशचंद्र बॅनर्जी, बद्रुद्दीन तय्यबजी, मोतीलाल नेहरू, गोपाळ कृष्ण गोखले व महात्मा गांधी यांच्यासारख्या अनेक देशभक्तांनी कोट्यवधी जनतेला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे क्रत अंगीकारले. भारतीय राजकारणाचे ‘पितामह’ हे बिरूद्ध त्यांच्यासाठी अत्यंत यथोचित आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात दादाभाईंनी केलेल्या हिंदुस्थानातील व इंग्लंडमधील विविध चळवळींचा, लंडनमधील पार्लमेंट सदस्यत्वाच्या कालखंडातील महत्त्वाच्या घडामोडींचा, त्यांच्या कौटुंबिक व हृद्य व्यक्तिमत्त्वाच्या वेगवेगळ्या कमिशनवरील नेमणुकींच्या कामाचा सविस्तरपणे आढावा घेतला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Saket Publication","offer_id":49641959489834,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Dadabhai-Nooroji-Spin-13M_7a9439a2-84bc-4f99-a41f-8601efe27d65.jpg?v=1732964165","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/dadabhai-nouroji-by-nimbajirao-pawar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}