{"product_id":"dagina-by-nivrutti-jori","title":"Dagina by Nivrutti Jori दागिना निवृत्ती जोरी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eग्रामीण महाराष्ट्रातील जनजीवनाचा धांडोळा कथांच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न निवृत्ती जोरी यांनी ‘दागिना’ कथासंग्रहाच्या निमित्ताने केला आहे. लेखकाची ही दुसरी साहित्यकृती.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयासंग्रहातील प्रत्येक कथा ही लेखकाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या घेतलेल्या अनुभवांवर आधारित आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसमाजातील उपेक्षित घटकांचा संघर्ष एका संवेदनशील लेखकाच्या मनाला साद घालतो, तेव्हा त्याच्या लेखणीतून ‘दागिना’सारखी साहित्यकृती जन्माला येते, असे हे पुस्तक वाचताना ठायीठायी जाणवते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागांत वास्तव्य घडले, तेव्हा लेखकाने सरकारी फायलींच्या ढिगाऱ्यापलीकडे पाहात समाजस्थितीचे जे निरीक्षण केले, त्यातून ह्यासर्व कथा आकारास आल्या आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकष्टकऱ्यांना रोजच्या जीवनात कोणकोणत्या अडचणींचा मुकाबला करावा लागतो, याचे चित्र वाचकांसमोर रेखाटताना लेखक कधी सर्वसामान्यांचा वन्यजीवनाशी झालेला संघर्षकथन करतो, तर कधी हातातोंडाची गाठ पडण्यासाठी काहींना करावीलागणारी तारेवरची कसरतउभी करतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजेवढ्या उत्साहाने मानवी भावभावनांचे तरल चित्रण लेखकाने केले आहे, तेवढ्याच जोशात ग्रामीण साहित्याचा वाचकवर्ग त्यास प्रतिसाद देईल, ही अपेक्षा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Nivrutti Jori","offer_id":50212407247146,"sku":"Nivrutti Jori","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/dagina1.jpg?v=1747811517","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/dagina-by-nivrutti-jori","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}