{"product_id":"darpan-दर्पण-author-kishor-medhe-किशोर-मेढे","title":"Darpan  Author: Kishor Medhe | किशोर मेढे | दर्पण","description":"\u003cp\u003eमराठी कवितेला अन्य भारतीय भाषांमधील काव्यानुभवाशी जोडून देणारा एक सेतू म्हणजे हा कवितासंग्रह. हिंदीमध्ये कविता लिहिणारे गुलज़ार आणि जावेद अख्तर,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसंतालीसारख्या जनभाषेतून काव्यानुभव व्यक्त करणार्‍या निर्मला पुतुल आणि तिबेटसारख्या पीडित क्षेत्राच्या व्यथा काव्यबद्ध करणारे ल्हासंग सिरींग यांच्या निवडक कवितांचे हे मराठी अनुवाद आहेत. किशोर मेढे यांनी अत्यंत संवेदनशीलतेने या परभाषिक भारतीय काव्याशी या अनुवादातून हृदयसंवाद साधला आहे आणि त्या काव्यानुभवाला मराठी परिवेशात यथातथ्यपणे सादर केले आहे. वेगळ्या भाषांतून काव्यलेखन करणार्‍या या भारतीय कवी-कवयित्रींचे अनुभव एकाच आंतरिक चेतनेने स्पंदन पावत आहेत;\u003cspan\u003e \u003c\/span\u003eयाचा प्रत्यय या काव्यानुवादातून येतो. या कवी-कवयित्रींच्या वेदनेची आर्तता आपल्याला ओळखीची वाटते. व्यक्तीच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा घेतलेला शोध,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eभोवतालच्या जगातील दडपणांमुळे होणारी घुसमट,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eस्वातंत्र्यासाठी फोडलेला टाहो,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eजीवनाने हाती दिलेले विदारक सत्य या सगळ्या प्रक्षेपणांमध्ये आपल्याला आपली ओळख नव्याने प्रतीत होते. याचे श्रेय किशोर मेढे यांच्या सक्षम आणि सर्जनशील अनुवादाला आहे. मराठी कवितेला अन्यभाषिक भारतीय कवितेच्या अंतरंगाची संवेद्य प्रतीती घडविण्याच्या दृष्टीने;\u003cspan\u003e \u003c\/span\u003eआणि पर्यायाने मराठी कवितेला समृद्ध करण्याच्या दृष्टीने हा काव्यसंग्रह अतिशय लक्षणीय आणि महत्त्वपूर्ण आहे. - प्रा. डॉ. निशिकांत मिरजकर\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642180706602,"sku":null,"price":81.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Darpan-500x500_8b2361c4-6ff6-4e73-ba65-b5c7c1d9058e.jpg?v=1732967063","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/darpan-%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a3-author-kishor-medhe-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a2%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}