{"product_id":"drushtant-दृष्टांत-author-dnyaneshwar-lendhve-ज्ञानेश्वर-लेंडवे","title":"Drushtant |दृष्टांत Author: Dnyaneshwar Lendhve |ज्ञानेश्वर लेंडवे","description":"\u003cp\u003eप्रसिद्धीच्या परिघाबाहेर राहून कवितेवर मनापासून प्रेम करणार्‍या ज्ञानेश्वर लेंडवे यांचा हा कवितासंग्रह अतिशय तरल आणि भावगर्भी आहे. वरकरणी सरळ,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसाधी,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसोपी वाटणारी कविता मात्र खोल अर्थपूर्ण आहे.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘डोहाकाठी’, ‘पाऊस’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअशा कवितांमधून हळुवारपणे झिरपत जाणारे त्यांचे संवेदनशील मन\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘सावल्या’, ‘सांज’, ‘मी’मधल्या कवितांमधून गूढवादाकडे प्रवास करते. कवी स्वतःच\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘पांथस्थ’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहोतो. त्याचे हे होणे त्याच्या नकळत झाले आहे. निसर्ग आणि मानवी जीवन यांतील गूढता अधिक गर्द करणारी ही कविता केवळ दुःख किंवा वेदनांना स्पर्श करत नाही,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतर भोवतालचा संपूर्ण अवकाश व्याप्त करण्याचा ती प्रयत्न करते.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘दृष्टांत’मधील कविता म्हणजे कवीचा कवीशी असलेला संवाद नाही,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतर हे कवच फोडून ती रसिकांशी संवाद करू लागते. लेंडवे यांच्या कवितेचे हेच वेगळेपण आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642180641066,"sku":null,"price":81.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Drushtanta-500x500_461cf127-8004-482b-add5-27df99c8f7e3.jpg?v=1732967062","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/drushtant-%e0%a4%a6%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4-author-dnyaneshwar-lendhve-%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b5%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}