{"product_id":"ek-dukh-manat-laplela-एक-दु-ख-मनात-लपलेलं-author-prashant-velapure-प्रशांत-वेळापुरे","title":"Ek Dukh Manat Laplela | एक दु:ख मनात लपलेलं Author: Prashant Velapure | प्रशांत वेळापुरे","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eकेवळ हौस म्हणून वा उत्साह म्हणून शब्दांशी खेळणारे जे नवोदित कवी\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eआज आपणास दिसतात;\u003cspan\u003e \u003c\/span\u003eत्यापेक्षा श्री. प्रशांत वेळापुरे यांची कविता सर्वस्वी वेगळी आहे. जीवनाविषयी स्वत:चे काही वेगळे सांगू पाहणारे आणि काव्यनिर्मितीकडे गांभीर्याने पाहणारे ते एक कवी आहेत. एका तपाहून अधिक काळ ते कवितेची मन:पूर्वक साधना करीत आले असून जीवनाला लालित्य आणि लालिभा प्राप्त करून देणार्‍या विशुद्ध प्रीतीच्या आविष्कारापासून तो अवती-भवतीच्या समाजातील शोषितांच्या दु:खापर्यंत त्यांची काव्यप्रतिभा संचार करणारी आहे. दु:ख हा त्यांच्या कवितांचा स्थायीभाव असला तरी या दु:खाला अनेक पदर लाभले आहेत. अनेक सूर लाभले आहेत. भूक शमविण्यासाठी स्वत:चा देह अंथरणार्‍या माऊलीच्या दु:खापासून तो मुखवटे धारण करणार्‍या प्रतिष्ठित  बदमाशाकडून फसविल्या गेलेल्या सामान्य माणसापर्यंतचे दु:ख येथे प्रकट झाले आहे. आणि तेही काव्यात्म स्वरूपात सहज नि स्वाभाविक शब्दकलेतून नि कवितेवरील अभंग निष्ठेतून जन्मलेल्या वृत्तीतून.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642180608298,"sku":null,"price":63.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/EkDukhaManat-500x500_d6a95662-97ba-4bc0-9ee6-b51e424784fe.jpg?v=1732967060","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/ek-dukh-manat-laplela-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%a6%e0%a5%81-%e0%a4%96-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b2%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%82-author-prashant-velapure-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}