{"product_id":"fandry-by-hanumant-ajinath-lokhande-फँड्री","title":"Fandry by Hanumant Ajinath Lokhande फँड्री","description":"\u003cp\u003e'फँड्री' हा जात, धर्म, वर्ण, वर्ग, वंशादी भेदांचा अमंगळ चक्रव्यूह भेदून प्रेम फुलवत राहावं, असं स्फुल्लिंग चेतवणारा चित्रपट आहे. 'फँड्री'तील संघर्ष प्रेक्षकाला माणूसपणाच्या चिंतनात रमवतो. स्वतःतील छुप्या पशुत्वावर भिरकावलेला दगड त्याला न्याय्य वाटतो. अनुभव देत, हितगुज करत प्रेक्षकांचे भावनिक उन्नयन साधणाऱ्या 'फँड्री'सारख्या कलाकृती दुर्मीळ असतात. त्यांचा अनेक अंगांनी अभ्यास केला गेला पाहिजे. नेमके हेच काम या पुस्तकाद्वारे हनुमंत लोखंडे यांनी केले आहे. यातील चर्चेची, चिंतनाची मांडणी लेखकाच्या अभ्यासवृत्तीची आणि त्याच्यातल्या समंजस संवादकाची साक्ष देणारी आहे. विविध दृष्टिकोनातून 'फँड्री'चे आकलन करताना, चित्रपट अन् समाज यांच्यातील वीण उलगडून दाखवताना, आजवर आम्ही घडवलेल्या इष्ट-अनिष्ट समजुतींचा ऊहापोह करताना लेखकाने आपल्या ओघवत्या शैलीनं साधलेली सुभगता पुस्तक वाचनीय करते. सोबतच, किशोर कदम यांची समर्पक प्रस्तावना आणि लेखकाने घेतलेली नागराज मंजुळे यांची जिज्ञासू मुलाखत पुस्तकास आणखी समृद्ध करते. समकालीन जातिग्रस्त अवकाशात, प्रागतिक विचारांची पायवाट पाडणाऱ्या सुधारकांची लोभस दिंडी, संवेदनशील माणूसपणानं पुढे नेणारा नागराजसारखा कलाकार आणि त्याच्या कामाचे सौंदर्य उलगडून दाखवत विचारमग्न करणारा हनुमंत लोखंडेसारखा चिंतनशील अभ्यासक, हे दोघेही अनुपाचे आहेत\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"New Era Publishing House \/ Hanumant Ajinath Lokhande","offer_id":50807492378922,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Fandry_by_Hanumant_Ajinath_Lokhande.jpg?v=1762939410","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/fandry-by-hanumant-ajinath-lokhande-%e0%a4%ab%e0%a4%81%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}