{"product_id":"findri-mulicya-nakushipaṇachi-goṣṭa-by-dr-suneeta-borde","title":"Findri : Mulicya nakushipaṇachi goṣṭa by Dr. Suneeta Borde","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eपणजी, आजी, आई आणि मुलगी अशा हरएक पिढीतील स्त्रीच्या वाट्याला\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eआलेल्या ‘फिन्द्रीपणा’च्या (नकुशीपण) वाटा उलगडून दाखवणारी ही कादंबरी.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eआई आणि मुलीचा जीवनसंघर्ष असणाऱ्या या कादंबरीतील समाजचित्रणास जात व\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eपुरुषसत्तासंबंधाचे बहुल असे संदर्भ आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eबाईचा जन्म म्हणजे ‘इघीन’ आणि ‘काटेरी बाभूळबन’ असणाऱ्या\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eसमाजातील बाईपणाच्या दुःखशोषणाचा कहाणीप्रदेश या कादंबरीतून साकारला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eजात, धर्म, पितृसत्ता, लिंगभावाच्या दमनाबरोबर आधुनिक स्त्रीच्या संघर्षकर्तृत्वाची सुफळ कहाणी\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e या कादंबरीतून साकार झाली आहे. पराकोटीचा अभाव, दुःखशोषण,\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eसहनशीलतेबरोबर आत्मसन्मान आणि श्रेयसाची वाट वर्धमान करणाऱ्या आधुनिक स्त्रीची ही व्यथाकहाणी.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eआर्थिक परावलंबन आणि जात-पुरुषदमण पार्श्वभूमीवर ‘शिक्षणशहाणपण’ हा स्त्रियांच्या\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eदुःखमुक्तीचा अवकाश आहे याचे विवेकी भान देणारी ही कथनदृष्टी आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eकादंबरीतील दलित समाजजीवनशैलीच्या तपशीलभरणाने समूहचित्रणाची कक्षा विस्तारली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eतसेच आंबेडकरी व स्त्रीवादी विचारव्यूहांच्या दृष्टीने समाजसत्तासंबंध न्याहाळण्याची दृष्टी\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eकादंबरीतून व्यक्त झाली आहे. सुनीता बोर्डे यांची कथनशैली ही गोष्टीवेल्हाळ आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eआत्मपरता आणि समूहरीतीच्या वास्तव-कल्पनाविष्काराची बेमालूम सरमिसळण या कथनरुपात आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eया रूपबंधास स्थळ, प्रदेश, व्यक्ती तसेच घटनाप्रसंगांच्या मनोहरी गुंफणीतून\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eललितशैलीची अनोखी परिमाणे लाभली आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eस्त्री दुःखशोषणाची जाण आणि अस्मिताभान याचा खोलवरचा प्रत्यय देणारी ही कादंबरी महत्त्वाची ठरते\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Marathi","offer_id":49625711542570,"sku":null,"price":342.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Findri-800x800_c99ee70a-573f-41c6-9ca1-f7f8a77afc31.jpg?v=1732609922","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/findri-mulicya-nakushipa%e1%b9%87achi-go%e1%b9%a3%e1%b9%ada-by-dr-suneeta-borde","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}