{"product_id":"freedom-on-fire-laxmikant-deshmukh-फ्रीडमऑनफायर-लक्ष्मीकांतदेशमुख","title":"FREEDOM ON FIRE | Laxmikant Deshmukh | फ्रीडमऑनफायर | लक्ष्मीकांतदेशमुख","description":"\u003cdiv class=\"tabbable bookdetailtabber\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv id=\"pane2\" class=\"tab-pane active\" data-mce-fragment=\"1\"\u003eया कथासंग्रहातील सातही कथा रशिया-युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या वर्तमान युद्धाच्या पार्श्वभूमीवरील आहेत. ‘द ग्रेट डिक्टेटर’मधील अभिनेत्री \/ मॉडेल बार्बारा देशप्रेमाने भारून, युद्धात उतरून, रशिया-युक्रेन युद्धावर आधारित सिनेमाची निर्मिती करते; पण... ‘लव्ह, वॉर अ‍ॅन्ड...?’मधील घटस्फोटित अँजेलिना आणि सैनिक असलेल्या बोरिसचं वैवाहिक आयुष्य एक दिवसाचं ठरतं. बोरिस मारला जातो युद्धात; पण त्याचा वंश वाढत असतो अँजेलिनाच्या पोटात. मग अँजेलिनाच्या मनात पडतं महाकादंबरीचं बीज... ‘फ्रीडम ऑन फायर’मध्ये इगोर आणि सोफिया या पिता-पुत्रीच्या आंधळ्या रशियानिष्ठेला दिमित्री हा इगोरचाच मुलगा दाखवतो युक्रेनमधील विध्वंसाचा आरसा आणि मग सोफिया जाग आणू पाहते रशियनांना... ‘सच ए लाँग जर्नी’ मध्ये भारतीय शिवच्या मनात पाकिस्तानविषयी असलेल्या अढीमुळे माहजबिन ऊर्फ मून या पाकिस्तानी मुलीची दोस्ती स्वीकारायला तो तयार नसतो; पण युक्रेनमधील युद्धामुळे आपापल्या मायदेशी परतत असतानाच्या प्रवासात शिवचं मनपरिवर्तन होतं...रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे दोन्ही देशांतील नागरिकांच्या मनात उठलेल्या भावनिक\/मानसिक संघर्षाच्या आणि राष्ट्रप्रेमाच्या उत्कट कथा\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"reviews-section\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":49626132283690,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/3939_46412f88-5224-4dbd-8de0-ae56c62feff3.jpg?v=1732613588","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/freedom-on-fire-laxmikant-deshmukh-%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a1%e0%a4%ae%e0%a4%91%e0%a4%a8%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b0-%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}