{"product_id":"gatha-swarajyachi-pailu-shivacharitrache-by-sadanand-kadam","title":"Gatha Swarajyachi Pailu Shivacharitrache by Sadanand Kadam","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशिवछत्रपतींचे आयुष्य म्हणजे चमत्कार खरा. पण तो दैवी चमत्कार नव्हे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यामागे होता शिवरायांचा पराक्रमी पुरूषार्थ. बुद्धी, विचार, धाडस, हिंमत, \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंवेदनशीलता, मुत्सद्देगिरी, द्रष्टेपण अशा अनेक गुणांच्या समुच्चयातूनशिवराय\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनावाचे हे उत्तुंग शिल्प घडलेले आहे. ते समजून घ्यायचे असेल,तर आपणास \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपली दृष्टी विस्तारावी लागेल.दशदिशांनी हे शिखर न्याहाळावे लागेल.सदानंद \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकदम यांनी ‘गाथा स्वराज्याची’मधून हाच प्रयत्न केला आहे.शिवराय म्हणजे केवळ \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलढाया नव्हेत. केवळ अफझलवध, शाहिस्तेखानावरील छापा, आग्र्याहून सुटका,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘गड आला पण सिंह गेला’ हे एवढेच म्हणजेही शिवराय नव्हे.हे तर आहेच, पण \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसेच आणखीही काही लखलखते पैलू आहेत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला.त्यांची \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदूरदृष्टीची राजनीती, अर्थकारण, प्रशासन, व्यवस्थापन, राष्ट्रवाद, त्यांचे व्यवहारचातुर्य, \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यांचे शौर्य, त्यांची गुप्तचरसंस्था आणि त्यांची लोकहिताची कळकळ या सगळ्यातून \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआकारास आलेला हा मऱ्हाटीमेरू.सदानंद कदम यांनी या पुस्तकातून शिवरायांच्या \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eव्यक्तिमत्त्वातील या अशा विविध पैलूंचा मोठ्या जाणकारीने वेध घेतलेला आहे. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयाचे वेगळेपण हे ठरते,की हा केवळ रूक्ष इतिहास नाही. यात रोचकता आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयात भावना आहेत.एका शिवप्रेमीने अन्य शिवप्रेमींच्या काळजात शिवप्रेमाची\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमशाल बुद्धिपूर्वक तेजाळत राहावीयासाठी कळकळीने मांडलेला हा अभ्यासपूर्ण \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रपंच आहे.विकृत इतिहासाच्या ध्वजदंडावर अस्मितांच्या पताका उभारण्याचा \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहा काळ.अशा काळात शिवछत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारे हे पुस्तक \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअत्यावश्यक होते.- - रवि आमले\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Sadanand Kadam","offer_id":50166683566378,"sku":"Sadanand Kadam\/02\/05\/2025","price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/GathaSwarajyachi_CoverArtwork_Version13-19March2025__Q-800x800.jpg?v=1746185699","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/gatha-swarajyachi-pailu-shivacharitrache-by-sadanand-kadam","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}