{"product_id":"ghatkapalane-घटकापळाने-author-santosh-shenai-संतोष-शेणई-1","title":"Ghatkapalane | घटकापळाने Author: Santosh Shenai |संतोष शेणई","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eअनुवादातून अन्य भारतीय भाषांमध्ये पोहोचलेली आणि दुसर्‍या भाषकांकडून कौतुकवती झालेली तुझी कविता आता संग्रहरूपाने येते आहे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहे ऐकून आनंद झाला. समकालीन कवितेच्या कोरसात तुझी भावकविता स्वतंत्र आत्मस्वर ऐकवणारी आहे. सामाजिक विचारसरणीची प्रतिरूपे या\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eकवितेत आढळत नाहीत,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eमात्र वर्तमानाच्या पक्व भानाचे परिमाण या कवितांना लाभले आहे. मराठी कवितेत पहिल्यापासूनच भावविवशता खूप आढळते. पण अनुभव व्यक्त करतानाची अलिप्तता तुझ्या कवितेला भावविवशतेपासून बव्हंशी दूर ठेवते. वर्तमानाचे पक्व भान आणि भावविवशता टाळण्यातील यश हा तुझ्यातील पत्रकाराने कवीला करून दिलेला लाभ असला पाहिजे. तुझी प्रेमकवितांची माळका,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eप्रेम व मैथुनाचे संदर्भ देत त्या पलीकडच्या सर्जनाच्या शक्यता अजमावते. मृत्यूविषयक\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eकवितांची माळकाही जगण्याची ओढच वेगळ्या तर्‍हेने व्यक्त करते. भारतीय आध्यात्मिकतेचे संस्कार जपणार्‍या तुझ्या कवितेला आपल्या जगण्याचा मूळ संदर्भ काय,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eत्याचा अर्थ काय,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहे तपासून घेण्याची ओढ आहे. यातून उदासीनता येण्याचा असणारा धोका टाळून तुझी कविता नेहमीच सूर्योपासना करणारी,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eउजेडाचे गाणे गाणारी झाली आहे. तुझा हा आविष्कार खोलवर भावणारा आहे...\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642173792554,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Ghatakaapalaane-500x500_42045fbe-f449-4554-8ba7-560020a07158.jpg?v=1732966883","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/ghatkapalane-%e0%a4%98%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-author-santosh-shenai-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%b7-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a4%88-1","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}