{"product_id":"hedam-by-nagu-virkar-हेडाम","title":"Hedam by Nagu Virkar हेडाम","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'बनगरवाडी' या अजरामर कादंबरीच्या अलौकिक रस्त्यावरचा पुढचा पल्ला म्हणजे 'हेडाम' आहे. १९३८ मध्ये व्यंकटेश माडगुळकर यांनी माणदेशी मेंढपाळाचं जगणं पहिल्यांदा साहित्यात आणलं. त्याच माणदेशातील एक धनगराच लेकरू मेंढ्याच्या कळपात वाढलेला, नागु जेव्हा आपल्या व आपल्या समाजाच्या भोगाचे चटके स्वतः त्याच्या बोलीभाषेत शब्दबद्ध करतो तेव्हा सहाजिकच त्याच्या शब्दांना मेंढीच्या कच्च्या दुधाचा सुगंध आहे. शेरडाकरडाच्या लेंड्यामुताचा गंध आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआपली जित्राबं घेऊन चारा मिळेल तिकडे रोज नवं गाव नवी चूल करत फिरणाऱ्या वारा, पावसात उघड्या माळावर राहूटी करणाऱ्या 'रानशाळेत' लेखकाचं जीवन गेलं आहे. त्यामुळे तो मोठ्या आगत्याने त्या चित्रमय रित्या वाहत्या जीवनाला तुंबा घालून साहित्याचे कुंड किंवा रांजन भरतो. गुरुजनांची कृपादृष्टी शिष्यावर झाल्यावर काय घडतं ते वाचनीय आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकोकरं, बालींगं, खडपा, कोयाळ, मारकुंडा, कोडगा, फासमी कुत्रं, हुर्द, छकाटा, खवीस, किंकाळी, पासारी, मोहरक्या, अवकाळ गाबनं पाऊस, कोचाळ, खेकटं, फाजर, हेलगडी, डोकं भंजाळनं, वांबाळ, बावळाट, खैताळ अशा प्रकारे मराठी अभिजात भाषेच्या कुशीत सुरती रूपयाच्या मोहरा पेरत जाण्यात तसा हा गडी शब्दांची पखरण करत राहतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'हेडाम' ही कांदबरी समाजशास्त्र मानववंशशास्त्राच्या अशा अनेक ज्ञानशाखांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा 'दस्ताऐवज' आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअसे गोड वाङ्मयीन अपघात क्वचितच कधीतरी घडतात. या कादंबरीच्या निमित्ताने माय मराठीच्या ओटीत नागू विरकर यांनी अपरिचित समर्पक व माळामुरडाच्या शब्दफुलांचा जो झेला मुठीमुठीने ओतला आहे. त्या दृष्टीने 'उपरा' नंतर अशी अजब करामत क्वचितच कोणाकडून घडली असेल तर ती हेडाममधूनच. वाचकांना एक अप्रतिम ग्रामीण कलाकृती वाचल्याचा नक्की आनंद होईल. प्रत्येकांनी ती वाचली पाहिजे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनागु विरकर यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा आणि भंडारा उधळून अभिनंदन!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003e- डॉ. विश्वास पाटील\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Samiksha Publication \/ Nagu Virkar","offer_id":50347628790058,"sku":"Nagu Virkar","price":320.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Hedam_Nagu_Virkar_Marathi.jpg?v=1753880201","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/hedam-by-nagu-virkar-%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%ae","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}