{"product_id":"indias-most-fearless-2-by-shiv-aroor-rahul-singh-इंडियाज-मोस्ट-फिअरलेस-2-शिव-अरूर-राहुल-सिंग","title":"India's Most Fearless 2 By Shiv Aroor \u0026 Rahul Singh इंडियाज मोस्ट फिअरलेस 2 - शिव अरूर, राहुल सिंग","description":"\u003cp\u003eदहशतवादविरोधातील लक्षणीय मोहिमांच्या आजवर कुणीही न सांगितलेल्या हकिगती;\u003cbr\u003e2016 सालच्या सर्जिकल स्ट्राइक्सच्या पार्श्वभूमीवर झालेल्या दहशतवादविरोधी चकमकींचे खिळवून ठेवणारे प्रत्यक्षदर्शी वृत्तान्त; काश्मीरमधल्या भरदिवसा रात्रीसारख्या भासणाऱ्या विलक्षण जंगलांमधून दहशतवाद्यांचा पाठलाग करणारे सैनिक; पाणबुडीवरच्या संपूर्ण क्रूला वाचवण्यासाठी आपल्या सर्वस्वाची आहुती देणारी तरुण नौदल अधिकाऱ्यांची जोडगोळी; आपल्या सोबत्यांच्या मृत्यूचा सूड उगवत नाही तोपर्यंत झोपूही न शकलेला हवाईदलातला एक कमांडो; पाकिस्तानी दहशतवाद्यांवर स्पेशल फोर्सेसने केलेल्या भीषण हल्ल्यामध्ये आत्मा शांत करणारा आयकर खात्यातला एक ‘बाबू’आणि अशा अनेक कथा. त्यांच्या कथा, त्यांच्यात शब्दांत किंवा त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांना सोबत करणाऱ्यांच्या शब्दांत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘इंडियाज मोस्ट फिअरलेस’च्या बहुप्रतिक्षित दुसऱ्या भागात थक्ककरून सोडणाऱ्या निर्भयतेचं आणि भारतीय सैन्यदलाने कर्तव्य बजावताना दाखवलेल्या अतुलनीय धैर्याचं अत्यंत जवळून दर्शन घडवणाऱ्या या कथा वाचल्याच पाहिजेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘सैन्यदलाच्या धुरंधर कामगिरीचा खराखुरा आत्मा अगदी बारीक तपशिलांसह टिपण्याची कामगिरी ‘इंडियाज मोस्ट फिअरलेस’ने पुन्हा एकदा करून दाखवली आहे.\u003cbr\u003eजनरल बिपिन रावत, माजी सैन्यदलप्रमुख\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eIndia's Most Fearless - 2 | Shiv Aroor \u0026amp; Rahul Singh Translated By : Sayali Paranjpe\u003cbr\u003eइंडियाज मोस्ट फिअरलेस 2 । शिव अरूर आणि राहुल सिंह अनुवाद : सायली परांजपे\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Shiv Aroor Rahul Singh","offer_id":50204502950186,"sku":null,"price":420.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/MainIndiasmostfearless2.jpg?v=1747465383","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/indias-most-fearless-2-by-shiv-aroor-rahul-singh-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%ab%e0%a4%bf%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b8-2-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}