{"product_id":"itihasache-muk-sakshidar-virgal-ani-satishila-by-anil-dudhane-इतिहासाचे-मूक-साक्षीदार-वीरगळ-आणि-सतीशिळा","title":"Itihasache Muk Sakshidar Virgal Ani Satishila by Anil Dudhane इतिहासाचे मूक साक्षीदार वीरगळ आणि सतीशिळा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमहाराष्ट्र जसा साधू संतांची पावन भूमी तशीच ती शेकडो पराक्रमी वीरांची लढाऊ वीर भूमी. इथल्या प्रत्येक घरटी किमान एक तरी वीर पुरुष जन्माला आला. ज्यांनी स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर इथल्या भूमीचं आदिम काळापासूनच्या सर्व आक्रमणापासून प्राणपणाने संरक्षण केलं, प्रसंगी कसल्याही परताव्याची अपेक्षा न करता प्राणही दिले. त्यांच्या त्यागाला, त्यांच्या पराक्रमाला इथली माणसं इथली माती विसरली नाही. त्यांच्या वीरमरणापश्चात त्यांच्या स्मृती जगवण्यासाठी गावागावांच्या मध्यवर्ती ठिकाणी, मंदिरांच्या प्रांगणात, वेशीवर काळे कातळ शिल्पबद्ध करून ठेवण्यात आले. वीरांच्या स्मृती जागवणाऱ्या या कातळ शिल्पांना आपण वीरगळ म्हणून ओळखतो. या वीरांसोबत ज्या ज्या वेळी त्यांची पत्नी सती जात असे त्या त्या वेळी त्या स्त्रीच्या आठवणीत सतीशिळाही कोरली जाई. महाराष्ट्र एक गाव नसेल जिथं वीरगळ आणि सतीशिळा सापडणार नाही. पण या वीरगळींबद्दल- सतीशिळेबद्दल कमालीची अनास्था आणि अज्ञान जनमानसात दिसून येतं. आपल्या पूर्वजांच्या या अमूल्य लढाऊ ठेव्याबद्दलची अनास्था आणि अज्ञान दूर करण्याचं कार्य अनिल किसनराव दुधाने लिखित सदरील \"संदर्भ ग्रंथ करेल\" यात कसलाही किंतु नाही. वीरगळ- सतीशिळा म्हणजे काय ? त्यांचे प्रकार किती ? त्यांच्यावरच्या चिन्हांचे अर्थ काय ? इथपासून वीरगळ- सतीशिळांचं शास्त्रोक्त दस्तऐवजीकरण कसं केलं जावं ? वीरगळ- सतीशिळांचं संवर्धन कसं केलं जावं ?? याचीही अनिल दुधाने यांनी अत्यंत शास्त्रशुद्ध आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सोपी मांडणी केली आहे. गेली अनेक वर्षे अंधाऱ्या गर्तेत असलेलं इतिहासाचं एक अत्यंत महत्वाचं अंग अनिल दुधाने यांनी प्रचंड कष्ट सोसून या संदर्भ ग्रंथाच्या माध्यमातून उजेडात आणलं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Marathidesha Foundation \/ Anil Dudhane","offer_id":49653460697386,"sku":null,"price":675.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Screenshot_20220925-225741_Facebook.jpg?v=1733154535","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/itihasache-muk-sakshidar-virgal-ani-satishila-by-anil-dudhane-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%80%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a4%b3-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b3%e0%a4%be","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}