{"product_id":"itranama-by-hinakausar-khan-इत्रनामा-हिनाकौसर-खान","title":"Itranama by Hinakausar Khan इत्रनामा हिनाकौसर खान","description":"\u003cp\u003eही गोष्ट ऐन पंचविशीतल्या नाझियाची. तिच्या पत्रकारितेची, तिच्या मुस्लीम असण्याची, तिच्या सामाजिक जाणिवांची, तिच्या मैत्रीची आणि तिच्या प्रेमाचीही !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजगण्याविषयीच्या कल्पना मनात स्पष्ट असणाऱ्या नाझियाला सुमीत भेटतो. समंजस, शहाणा आणि थोडासा कन्फ्युज्डही ! दोघंही एकमेकांत गुंतत जातात. भलेही अलीकडचे काही तरुण धर्म-जात मानत नसतील, मात्र नकळत्या वयात झालेल्या संस्कारांची सोबत तर प्रत्येकाबरोबर असतेच. प्रेमात सबकुछ करायला तयार असणारी मंडळी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र गोंधळून जातात, अशावेळी उमगलेली आस्था आणि न उमगलेली आस्था यांच्यातलं घर्षण अटळ होऊन जातं. या सगळ्या व्यवहार-संघर्षातून नाझिया आणि सुमीतही सुटलेले नाहीत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलहानपणापासूनचा नाझियाचा घट्ट मित्र असद हा तिच्याच धर्मातला… तिच्या विचारांचा, तिच्या स्वप्नांचा आदर करणारा आणि तिच्यावर बेहद प्यार करणाराही… पण प्रेम असं सोयीने करता येतं का? अनेक पेच, अनेक प्रश्न…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रेम, मैत्री, आस्था, आस्तिकता आणि मानसिक आंदोलनाच्या विवरात अडकलेल्या या तिघांची धर्मापलीकडे जाणारी कादंबरी…\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Hinakausar Khan","offer_id":51020497027370,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/ItranamabyHeenakausarKhan.jpg?v=1767526625","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/itranama-by-hinakausar-khan-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%8c%e0%a4%b8%e0%a4%b0-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}