{"product_id":"jata-mukti-by-dr-sudhir-kumbhar","title":"Jata Mukti by Dr. Sudhir Kumbhar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारताच्या विस्तीर्ण आध्यात्मिक परंपरेत जटा केवळ आध्यात्मिक बंधनाचे प्रतीक \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eम्हणून ओळखल्या गेल्या, परंतु त्या पलीकडे काही विशिष्ट परिस्थितींमध्ये केसांत \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजटा निर्माण होतात. त्यामागची कारणे आजही आधुनिक विज्ञानासाठी गूढ आहेत, \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपरंतु स्त्रियांच्या आरोग्याशी निगडित या समस्येचे स्वतंत्र अस्तित्व आहे. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअंधश्रद्धा, चुकीने दृढमूल झालेला पारंपरिक विश्वास आणि धर्माधारित रूढी यांच्या \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रभावामुळे अनेक स्त्रिया स्वतःच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊनही जटा काढण्यास \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eधजावत नाहीत. अशा स्थितीत त्यांना केवळ आधारच नव्हे, तर त्यांच्या जगण्याच्या \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलढाईला दिशा देणारा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मदतीचा हात आवश्यक असतो. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसामाजिक आणि पितृसत्ताक मानसिकतेने जखडलेल्या या स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदेण्याच्या दिशेने जटा निर्मूलन आंदोलन हा क्रांतिकारी टप्पा ठरला. या चळवळीने \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमहिलांच्या शरीरावरचा त्यांचा स्वतःचा हक्क अधोरेखित केला, तसेच वैज्ञानिक विचार, \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआरोग्य, मानवाधिकार आणि उपेक्षित महिलांच्या अस्तित्वाला प्रतिष्ठा दिली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक अशाच अनेक स्त्रियांच्या जटा मुक्तीच्या प्रवासाची कहाणी सांगते. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यामागची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यांनी सोसलेल्या यातना आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया अंधश्रद्धांना कसा तडा गेला, हे उलगडण्याचा प्रयत्न यात केला आहे. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eही कहाणी केवळ जटा निर्मूलनाची नाही, तर स्वतंत्र विचारसरणी, स्त्री-हक्कांची जागृती \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणि विज्ञानाच्या मदतीने सामाजिक परिवर्तन घडवण्याच्या सामर्थ्याची आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआदिवासी, दलित आणि बहुजन समुदायांच्या स्वतंत्र सांस्कृतिक अस्तित्वाला आणि \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यांच्या संघर्षाला वैज्ञानिक दृष्टीकोन व विवेकवादाची जोड देत अंधश्रद्धेच्या जोखडातून \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमुक्त होण्याचा आणि करण्याचा हा प्रवास प्रत्येक वाचकाला अंतर्मुख करेल. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया परिवर्तनाची जाणीव तुम्हाला नव्या विचारांचा भाग बनवेल आणि \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविज्ञाननिष्ठ समाजाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यास प्रेरित करेल!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Dr. Sudhir Kumbhar","offer_id":50166698869034,"sku":"Dr. Sudhir Kumbhar","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Jatamukticover_March2025-800x800.jpg?v=1746186253","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/jata-mukti-by-dr-sudhir-kumbhar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}