{"product_id":"jivanacha-upasak-karmveer-lohakare-guruji-जीवनाचा-उपासक-कर्मवीर-लोहोकरे-गुरुजी-author-indrajit-patil-इंद्रजीत-पाटील","title":"Jivanacha Upasak : Karmveer Lohakare Guruji | जीवनाचा उपासक : कर्मवीर लोहोकरे गुरुजी Author: Indrajit Patil | इंद्रजीत पाटील","description":"\u003cp\u003eशिक्षणाचा आणि ज्ञानाचा प्रवाह शेवटच्या माणसापर्यंत पोचावा, यासाठी कर्मवीर लोहोकरे गुरुजी यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. शिक्षणातून बहुजनांचा विकास हेच त्यांचे ध्येय होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगौडगांव, ता.बार्शी, जि.सोलापूर या छोट्याशा खेड्यात लोहोकरे गुरुजी यांनी शिक्षणाचे रोपटे लावले. ते रुजविण्यासाठी व ते वटवृक्षात परावर्तित करण्यासाठी गुरुजींनी अहोरात्र श्रम घेतले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगुरुजींनी बहुउद्देशीय, विविधांगी शिक्षण देणारी संस्था निर्माण केली. शेती हा विषय केंद्रस्थानी ठेवून त्यांनी तंत्रशिक्षणाचीही सोय एका छोट्या खेडेगावात केली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंस्थेचा व्याप एखाद्या विद्यापीठासारखा वाढवला. छोट्याशा खेड्यात कृषी विद्यापीठाचे महान स्वप्न त्यांनी पाहिले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहा प्रवास एका जिद्दी व कल्पक अशा सामान्य माणसाचा आहे. शाळेतील गुरुजी ते महर्षी असा प्रवास काही सोपा नव्हता. हा सगळा प्रयत्न जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. श्री इंद्रजीत घुले यांनी हा प्रवास आपल्या ओघवत्या व काव्यमय शैलीत इथे चित्रित केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएक आदर्श शिक्षणसंस्थाच नव्हे तर आदर्श ग्रामरचना करणार्‍या गुरुजींचे कार्य प्रसिद्धीविन्मुख आहे. म्हणूनच गुरुजींचे प्रेरणादायी कार्य-कर्तृत्व जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावे\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagadha Prakashan \/ Marathi","offer_id":49642207445290,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Final_JeevanachaUpasakCoverNEW-500x500_1_bec66896-ba81-4f93-81e1-52e23865937d.jpg?v=1732967577","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/jivanacha-upasak-karmveer-lohakare-guruji-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a5%80-author-indrajit-patil-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}