{"product_id":"kadambarivishayi-कादंबरीविषयी-author-dr-harishchandra-thorat-डॉ-हरिशचंद्र-थोरात","title":"Kadambarivishayi | कादंबरीविषयी Author: Dr. Harishchandra Thorat |डॉ. हरिशचंद्र थोरात","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eडॉ हरिश्चंद्र थोरात हे जसे आधुनिक समीक्षासिद्धान्तव्यूहाचे अभ्यासक आहेत,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतसेच ते कादंबरी या साहित्यप्रकाराचेही मर्मज्ञ अभ्यासक आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eकादंबरीचा आशय,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eत्या आशयाला असलेले अनेकविध सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ यांची जशी ते सूक्ष्म छाननी करतात,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतशीच ते कादंबरीची कथनतंत्रे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतिची संरचना यांचीही विस्ताराने चिकित्सा करतात. त्यांच्या या कादंबरीचिकित्सेला 1960 नंतरच्या संरचनावाद,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eकथनमीमांसा,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eमनोविश्लेषणवाद,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसंवादवाद या पाश्चात्त्य सिद्धान्तव्यूहांचा संदर्भ आहे. डॉ. थोरातांचा कादंबरीचा हा अभ्यास केवळ आशय,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eकेवळ तंत्रे वा केवळ संरचना यांचा अभ्यास राहत नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eत्याला कादंबरीच्या समग्रतेचा संदर्भ प्रापत होतो. त्यांचे कादंबरीविषयी हे नवे पुस्तक याचा प्रत्यय देणारे आहे. वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या निमित्ताने कादंबरीविषयी लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहे खरे. परंतु या सर्व विवेचनाच्या गाभ्याशी\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘कादंबरी’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहा साहित्यप्रकार आहे. या वेगवेगळ्या लेखांमध्ये या प्रकाराच्या संदर्भात निर्माण होणारे प्रश्न महत्त्वाचे आहेत. कादंबरीविषयीच्या त्या त्या प्रश्नाच्या संदर्भात डॉ. थोरात विशिष्ट कादंबरीचा वा कादंबरीकाराचा परामर्श घेतात. कादंबरी या प्रकारासारखीच कादंबरीवरील मोकळीढाकळी चर्चा असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. त्यामुळे हे पुस्तक कादंबरी या प्रकाराविषयीच नव्हे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतर आधुनिक मराठी साहित्य,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसमाज व संस्कृती यांविषयीही मर्मदृष्टी देणारे आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642189324586,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Kadambarivishayi-500x500_188f2e69-c471-452a-a0e7-9f4618641145.jpg?v=1732967246","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/kadambarivishayi-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%af%e0%a5%80-author-dr-harishchandra-thorat-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%a5%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}