{"product_id":"kala-ani-sanskruti-ek-samanvay-कला-आणि-संस्कृती-एक-समन्वय-by-dr-sudhir-devare-डॉ-सुधीर-देवरे","title":"Kala Ani Sanskruti-Ek Samanvay | कला आणि संस्कृती-एक समन्वय by Dr.Sudhir Devare | डॉ.सुधीर देवरे","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\" id=\"tab-description\" role=\"tabpanel\" aria-labelledby=\"tab-title-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-tab-width\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eडॉ. सुधीर रा. देवरे हे कला, लोकजीवन व लोकवाङ्मयाचे अभ्यासक असून बालपणापासूनच डोंगऱ्या देव, म्हसोबा, आया, रोकडोबा, म्हस्कोबा, पिरोबा, आईभवानी, सप्तश्रृंगी आदी डोंगरकपारीतील लोकदैवते तसेच वीरदेव, मारूती, गौराई, कानबाई – रानबाई, आईमरी, भालदेव, खंडोबा, वेताळ, नाथबोवा \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eआदी ग्रामीण लोकदैवते हे त्यांनी जवळून \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eअनुभवलेले भावविश्व आहे. ‘शक्तिसौष्ठव’, ‘लोकधाटी’, ‘मातावळ’ असे ग्रंथ वाचताना डॉ. सुधीर रा. देवरे यांचे कुतुहल सहाजिकच जागे झाले. \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eकुठलाही कलाविष्कार किंवा सौंदर्यमूल्य ही स्वायत्त असू शकत नाहीत. काळ, समाज आणि परिवेश यांची ती निर्मिती असते. कला या त्या त्या कालखंडातील अपत्य असतात. निसर्ग आणि कला या परस्परपूरक असतात. किंबहुना कला या निसर्गाच्या अनुकरणातून जन्माला येतात. पंथ, संप्रदाय आणि धर्म यांचाही कलाविष्कारांशी घनीष्ट संबंध येत असतो…\u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eजगण्याचा धर्म आणि कलांचा पोत यांचा एकत्रित विचार केल्याने कलामीमांसा ही अप्रत्यक्षपणे जीवनमीमांसाही ठरते. मराठी समीक्षेतील जीवनवादी दृष्टीकोणाला नैतिकता, बोध, प्रचार यांच्या चौकटीतून मोकळे करून समग्र जीवनाच्या अवकाशात कलांच्या पोताचे दर्शन घेण्याची नवी जाणीव या मीमांसेने दिली, हीच या समीक्षेची सर्वात महत्त्वाची फलश्रुती आहे. \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eकला आणि संस्कृती यांचा परस्पर संबंध ही मीमांसा तपासून पाहते. कारण कला या माणसांच्या संस्कृतीच्या सारांश म्हणता येतील… \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e– डॉ. सुधीर रा. देवरे यांच्या दहा वर्षांच्या अथक परिश्रमातून ही ग्रंथनिर्मिती सिद्ध झाली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Shabdalay Prakashan \/ Marathi","offer_id":49626123534634,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Untitled-13-2-450x695_4d752017-c971-4ed0-8b52-4f336d4980c2.jpg?v=1732613292","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/kala-ani-sanskruti-ek-samanvay-%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%af-by-dr-sudhir-devare-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}