{"product_id":"kalvel-by-stephen-pereira-काळवेळ","title":"Kalvel by Stephen Pereira काळवेळ","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'वारमोड' (२००३) आणि 'पोपटी स्वप्न' (२०१४) नंतर स्टीफन परेरा ह्यांचा हा तिसरा कथासंग्रह. आपल्या अनुभवविश्वाशी प्रामाणिक राहून आगळे विषय नजाकतीने मांडणारे कथाकार म्हणून श्री. परेरा ह्यांचं कथालेखन लक्ष वेधून घेत आलं आहे. कथावस्तूची मौलिकता, अनोखे अनुभवविश्व, संभाव्यता, प्रत्ययकारिता आणि कथाघटकांचं सुसंघटीत रूप ह्या अंगाने पाहू गेल्यास वर्तमान वास्तवाला थेटपणे भिडणाऱ्या कथा म्हणून ह्या संग्रहातील 'काळवेळ', 'भोवरा', 'वेढा' इत्यादी कथांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. व्यक्ती आणि बदललेला भवताल ह्यांतील संबंध तपासायला लावणाऱ्या ह्या कथा आहेत. व्यक्तीचा सामाजिक वास्तवाशी असलेला संबंध बहुमुखी असतो, हे ह्या कथा अधोरेखित करतात. स्टीफन परेरा ह्यांच्या कथांतील अनुभव गंभीर आहेत; त्यांची हाताळणीही वृत्तीगांभीर्याने झाली आहे. मराठी कथेच्या परंपरेत अनोख्या अनुभवविश्वाची भर घालणारा हा संग्रह आहे, हे निश्चित! - डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Granthali \/ Stephen Pereira","offer_id":50225928405290,"sku":"Stephen Pereira","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/61oMom8wTqL._SY425.jpg?v=1748176389","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/kalvel-by-stephen-pereira-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b3","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}