{"product_id":"kanupriya-कनुप्रिया-author-sharad-reshamey-शरद-रेशमेय","title":"Kanupriya | कनुप्रिया Author: Sharad 'Reshamey' | शरद 'रेशमेय'","description":"\u003cp\u003eही कहाणी आहे कनुच्या म्हणजे कन्हैयाच्या प्रियेची - राधेची आणि अर्थातच तिच्या कनुचीही! तिच्याच शब्दांत. भारतीय जनमानसावर शतकानुशतके अधिराज्य करणार्‍या ह्या सर्वाधिक लोकप्रिय प्रेमीयुगुलाच्या बहुपेडी नात्याचा त्यातील एकाने घेतलेला हा धांडोळा!\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘कनुप्रिया’मधील राधा जनसामान्यांच्या मनातील प्रतिमेहून वेगळी आहे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eखूप वेगळी. कृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडूनही आपलं अस्तित्व त्याच्यात विलीन न करणारी,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eइतिहासात आपलं नाव न माळल्याबद्दल त्याला जाब विचारणारी आणि तरीही जन्मजन्मांतरीच्या पायवाटेवरील सर्वांत अवघड वळणावर त्याची वाट पाहणारी...\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘तुझ्या महान होण्यानं माझं काहीतरी उद्ध्वस्त झालं आहे का कनु?’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअसा आर्त प्रश्न विचारणारी राधा महायुद्धात असहाय असणार्‍या व्यक्तीचं,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eह्या काव्याला सार्वकालिक करणारं प्रतीक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642197188906,"sku":null,"price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/kanupriya-500x500_b64078be-3501-4834-a97d-44ee0f8eccff.jpg?v=1732967387","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/kanupriya-%e0%a4%95%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be-author-sharad-reshamey-%e0%a4%b6%e0%a4%b0%e0%a4%a6-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%af","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}