{"product_id":"lashkaratil-sevasandhi-लष्करातील-सेवा-संधी-author-major-dr-sham-kharat-मेजर-डॉ-शाम-खरात","title":"Lashkaratil Sevasandhi | लष्करातील सेवा-संधी Author: Major Dr. Sham Kharat | मेजर डॉ. शाम खरात","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eअनेक राष्ट्रप्रेमी युवकांना संरक्षण विभागात नोकरी करण्याची इच्छा असते. सैन्यदलात अधिकारी होणे ही अभिमानाची व आदराची गोष्ट आहे. ह्यासाठी\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसंस्थेत अनेक विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यासाठी त्यांना काही मार्गदर्शन मिळावे व त्यांचा हेतू सफल व्हावा हा ह्या पुस्तकाचा उद्देश आहे. प्रस्तुत पुस्तकामध्ये संरक्षण क्षेत्रातील भूदल,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eनौदल,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eवायुदल,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eनिमलष्करी दल ह्यांबद्दल माहिती दिलेली असून लष्करी सेवेत अधिकारी होण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता व पात्रताप्राप्तीचे मार्ग,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eविविध प्रशिक्षण संस्था,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eनिवडप्रक्रिया,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eएसएसबीची मुलाखत,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअधिकार्‍यांच्या रँक्स व बढती,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eत्यांना मिळणारे फायदे ह्यांबाबत सविस्तर माहिती दिली आहे. लष्करातील अधिकारी वर्गाबरोबरच सैनिकदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. चारही दलातील सैनिक होण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eशारीरिक व तांत्रिक पात्रता,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eनिवडप्रक्रिया,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eभरतीची केंद्रे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eभरती प्रक्रिया,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eत्यांच्या रँक्स व बढती,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसैनिकांना मिळणारे ङ्गायदे ह्यांबद्दल माहिती दिली आहे. शालेय स्तरापासूनच मुलांना लष्करातील अधिकारी होण्यासाठीची पूर्वतयारी करता यावी ह्यासाठी स्थापन केलेल्या विविध शैक्षणिक संस्था,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eलष्करी अधिकारी व जवानांबरोबरच मुलकी कर्मचारीदेखील महत्त्वाचे आहेत. ह्या सर्व गोष्टींची माहिती एकत्रित स्वरूपात येथे उपलब्ध करून दिली आहे. रोजगाराबरोबरच देशसेवा करण्याची मनोमन इच्छा आहे अशा सर्व युवकांना व त्यांच्या पालकांना हे पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल ह्यात शंका नाही.   \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमेजर डॉ. शाम खरात\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएम. कॉम.,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eबी. एड.,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eजी.डी.सी. ऍण्ड ए.,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eपीएच.डी.\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e\n\u003cspan\u003e\u003c\/span\u003e१९९० पासून अहमदनगर महाविद्यालय,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअहमदनगर येथे अध्यापक\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cspan\u003e\u003c\/span\u003e२००५ ते २०११ अहमदनगर महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cspan\u003e\u003c\/span\u003e२०११ नंतर वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cspan\u003e\u003c\/span\u003e१९९७ पासून राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cspan\u003e\u003c\/span\u003eराष्ट्रीय छात्रसेनेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘महानिदेशक-राष्ट्रीय छात्र सेना’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eयांचे प्रशंसापदक\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003ch5\u003eInformation\u003c\/h5\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003e \u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642178969898,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/LashakaratilSevaSandhi-500x500_f4447dc2-0ac5-4603-bcdf-9f98364b2611.jpg?v=1732967000","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/lashkaratil-sevasandhi-%e0%a4%b2%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80-author-major-dr-sham-kharat-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%9c%e0%a4%b0-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%96%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}