{"product_id":"latanche-manogat-लाटांचे-मनोगत-author-dr-nilima-gundi-डॉ-नीलिमा-गुंडी","title":"Latanche Manogat |लाटांचे मनोगत Author: Dr. Nilima Gundi |डॉ. नीलिमा गुंडी","description":"\u003cp\u003eआज स्त्रियांच्या काव्याला समग्र मराठी काव्याचा एक उपप्रवाह म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. एकेकाळी 'अंतर्गृहातील कविता' हे स्त्रियांच्या काव्याचे स्वरूप होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआज बीजिंग येथील आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत सहभागी झालेल्या स्त्रीची कविता वाचायला मिळते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविसाव्या शतकाच्या शेवटच्या चरणात आदिवासी स्त्रियांचे काव्यसंग्रहही प्रकाशात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकाशित होणार्‍या स्त्रियांच्या काव्याचा समग्रपणे चिकित्सक विचार करणे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहे समकालीन समीक्षकांपुढे असलेले एक आव्हान आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. नीलिमा गुंडी यांनी 1950 ते 2000 या कालखंडातील स्त्रियांच्या काव्याचा चिकित्सक अभ्यास एका जिज्ञासू संशोधकवृत्तीतून केला आहे. हे पुस्तक वाचताना काव्यातून व्यक्त झालेल्या स्त्रीच्या आंतरिक जीवनाचे दर्शन वाचकांना घडेल. स्त्रीच्या जगण्याची बदलती परिभाषा यातून वाचता येईल. तसेच काळ आणि सांस्कृतिक पर्यावरण यांचे काव्याशी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअसलेले अनुबंधही यातून उजेडात येतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलाट ही स्त्रीत्वाची एक प्रतिमा. म्हणूनच या पुस्तकाचे शीर्षक आहे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e'लाटांचे मनोगत'. अभ्यासकांबरोबरच सर्व कवी,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eकवयित्री आणि रसिक यांनाही हे मनोगत जाणू घ्यावेसे वाटेल.\u003c\/p\u003e\n\u003ch5\u003eInformation\u003c\/h5\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642188669226,"sku":null,"price":117.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/LatancheManogat-500x500_b2e4eabe-a1d5-445f-bcf0-5b645e85c585.jpg?v=1732967239","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/latanche-manogat-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%a4-author-dr-nilima-gundi-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}