{"product_id":"lekhakache-ghar-by-urmila-chakurkar-लेखकाचे-घर-ऊर्मिला-चाकूरकर","title":"Lekhakache Ghar by Urmila Chakurkar लेखकाचे घर । ऊर्मिला चाकूरकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखकाच्या सगळ्या अवस्थांचं साक्षी असतं घर, घराच्या भिंती. त्याने सोसलेली अस्वस्थता, असोशी याची सहानुभूती घेतलेली असते या घराच्या भिंतींनी, तिथल्या वस्तूंनी. लेखन सुरू करण्यापूर्वीचा आवेग, नंतर अकस्मात लेखणी थांबल्यानंतर झालेली उलघाल – शब्द सुचत नाहीत, शब्द फुटत नाहीत अशा अवस्थेत घातलेल्या अस्वस्थ येरझारा, मनातला कल्लोळ हे सारं पाहिलेलं असतं लेखकाच्या घरानं. लेखक खरंच सर्वकाळ लेखक असतो, का मधून मधून विसरूनच जातो आपण लेखक असल्याचं हेसुद्धा माहीत असतं फक्त घरालाच. खरंच किती काळ की सर्व काळ, तो जळत असतो, धुमसत असतो आतल्या आत हेही माहीत असतं फक्त घरालाच. अशा प्रज्ञावंत-प्रतिभावंत लेकरावर घराचं छप्पर जरा अधिकच हळवं होऊन सावली धरतं मायेची. घराच्या भिंती जास्तच मायाळू होऊन जातात लडिवाळ अशा लेकरासाठी. घरातल्या वस्तूंना लागलेला असतो लेखकाचा परिसस्पर्श आणि येते एक वेगळीच झळाळी त्यांच्यावर!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Lokvangmay Grih \/ Urmila Chakurkar","offer_id":50412017582378,"sku":"Urmila Chakurkar","price":247.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Lekhkache-Ghar.jpg?v=1752838548","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/lekhakache-ghar-by-urmila-chakurkar-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%98%e0%a4%b0-%e0%a4%8a%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}