{"product_id":"loksankya-shastra-लोकसंख्याशास्त्र-by-avinash-kulkarni","title":"loksankya shastra लोकसंख्याशास्त्र   by  Avinash Kulkarni","description":"\u003cp\u003eशास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून लोकसंख्याशास्त्र या विषयाच्या विविध संकल्पनांच्या व्याख्या आणि अर्थ यांचे सदर पुस्तकात विवेचन केले आहे. तसेच या विषयाचे स्वरूप, व्याप्ती, अभ्यासाची आवश्यकता व महत्त्व अधोरेखित केले आहे. प्रस्तुत विषयाशी संबंधित अभिजात व नव-अभिजात विचारवंतांनी मांडलेले सिद्धान्त, विचार आणि त्यांच्या मर्यादा यांचा ऊहापोह या पुस्तकात केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलोकसंख्येची रचना व विभागणी यांच्यावर परिणाम करणाऱ्या घटकांची माहिती या पुस्तकात दिली आहे. विशेषतः जनन, मर्त्यता यांच्यातील कल (trends) यांबाबत जागतिक व भारतीय संदर्भातील सांख्यिकीय माहिती, तक्ते व आलेख-आकृत्यांद्वारे मांडली आहे. लोकसंख्येची लिंग संरचना, वयोगटानुसार रचना, व्यवसायानुसार विभागणी, भाषावार व धर्मानुसार विभागणी इ.ची सांख्यिकीय माहिती तक्त्यांद्वारे देऊन विश्लेषण केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलोकसंख्या आणि विविध सामाजिक प्रवाह यांची चर्चा करण्यासाठी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून उपयोग करून स्थलांतर, नागरीकरण, पर्यावरण, लोकसंख्या धोरण, मत व बालकल्याण धोरण इ.ची माहिती अंतर्भूत केली आहे. लोकसंख्या विषयातील आधुनिक प्रवाह उदा. लोकसंख्या त्रिमितीस्तंभ (Pyramid), लोकसंख्या प्रक्षेपण पद्धती (projection) इ.चाही समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमाजशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात 'लोकसंख्याशास्त्र' अथवा 'लोकसंख्या शिक्षण' या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर एम.फील., पी.एचडी. व प्रगत संशोधन करणाऱ्या अभ्यासकांसाठीदेखील हे पुस्तक एक संदर्भग्रंथ म्हणून अतिशय उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641837134122,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/954f_1024x1024_2x_413684da-e6ff-47a7-8350-ee0f310752fd.webp?v=1732963161","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/loksankya-shastra-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-by-avinash-kulkarni","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}