{"product_id":"mankeshwar-shiv-satvai-माणकेश्वर-शिव-सटवाई-author-navnath-shinde-नवनाथ-शिंदे","title":"Mankeshwar Shiv- Satvai | माणकेश्वर शिव-सटवाई Author: Navnath Shinde |नवनाथ शिंदे","description":"\u003cp\u003eप्रा. नवनाथ शिंदे यांनी प्रस्तुत ग्रंथात माणकेश्वर येथील ‘शिवसटवाई’ या देव-देवतांचा आणि मंदिराचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास सांगितला आहे. हा इतिहास मांडताना त्यांनी लिखित सामग्रीबरोबरच मौखिक सामग्रीचाही यथायोग्य वापर केला आहे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eत्यामुळे ऐतिहासिक मांडणी साधार झाली आहे. त्याचप्रमाणे येथे साजरे केले जाणारे उत्सव,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eपाळली जाणारी विधिविधाने,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eरूढ असणार्‍या प्रथा-परंपरा,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eविविध प्रसंगी म्हटली जाणारी लोकगीते-भक्तिगीते अशा सर्व गोष्टींचा तपशीलवार परामर्श या ग्रंथात घेतलेला आहे. देवदेवतांच्या आख्यायिका,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eलोककथा,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eलोकगीते यांचे संकलन करून त्यांचाही समावेश ग्रंथात केलेला दिसतो. अनेकवेळा देवदेवतांवर ग्रंथ लिहिताना अभ्यासक भाविक होतो,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eश्रद्धा चिकित्सेच्या आड येण्याची शक्यता असते. प्रा. नवनाथ शिंदे भावनिक न होता तटस्थपणे इतिहासाची मांडणी करतात हे मला फार महत्त्वाचे वाटते.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Pdamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642198171946,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/MankeshwarcheShiv-Satwai-500x500_155abbb4-65ba-4fa0-a075-7be29bb2ba66.jpg?v=1732967406","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/mankeshwar-shiv-satvai-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%9f%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%88-author-navnath-shinde-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a5-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}