{"product_id":"manus-asnyachya-aathavani-माणूस-असण्याच्या-आठवणी-by-devi-prasad-mishra","title":"Manus Asnyachya Aathavani by Devi Prasad Mishra tr. Ganesh Vispute माणूस असण्याच्या आठवणी","description":"\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003eManus Asnyachya Aathavani माणूस असण्याच्या आठवणी -\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eDevi Prasad Mishra, Ganesh Vispute\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"x11i5rnm xat24cr x1mh8g0r x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eनवीन जोडे विकत घ्यायला गेलेला, आणि किमती ऐकल्यावर हबकून चपलाही विकत न घेता परत फिरणारा माणूस, देहविक्रय करणाऱ्या स्त्रीसोबत तिला थकवणारा देहव्यापार केल्यानंतर, तिच्या पाठीवरच्या डागामुळे पैसे नाकारणारा माणूस, अगतिक, विफल, दयाळू ते कुटिल, हिंस्र, क्रूर अशी माणूसपणाची विविध चित्रं देवी प्रसाद मिश्र या छोट्या छोट्या कथांतून उभी करतात. मूलतः कवी असलेल्या देवी प्रसादांनी हा लहान कथांचा फॉर्म निवडताना, ज्याला त्यांनी 'अन्य कथा' असं नाव दिलं आहे, आपली कविता हरपू दिलेली नाही. त्यामुळे इथे समुद्राच्या आसपास स्वतःच्या आतला समुद्र घेऊन फिरणारी स्त्री भेटते, ज्याला नेहमी हवा व्हायचं होतं असा वृद्ध भेटतो आणि ऋत्विक घटकची 'सुवर्णरेखा' जिथे चालू असेल, अशा ठिकाणी उतरवा असं बस कंडक्टरला सांगणारा माणूस भेटतो.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x11i5rnm xat24cr x1mh8g0r x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eपण या साऱ्यातून देवी प्रसाद आपल्या समोर आणू पाहतायत तो आहे, 'एक भयंकर दुसऱ्या भयंकराची जागा घेतंय' अशा स्वरूपाचा समकाल. परिघावर राहणाऱ्या, हरलेल्या, उपेक्षित माणसांच्या जगण्याच्या या 'मंत्र पुटपुटाव्या' तशा सांगितलेल्या कथा तुम्हाला भारून टाकतील.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e- जयप्रकाश सावंत\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp class=\"product__text inline-richtext\"\u003ePapyrus Prakashan\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Papayras Prakashan \/ Devi Prasad Mishra","offer_id":50219720966442,"sku":"Devi Prasad Mishra","price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/manusasnyachyaathavani-F.jpg?v=1747979986","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/manus-asnyachya-aathavani-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%82%e0%a4%b8-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a0%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%80-by-devi-prasad-mishra","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}