{"product_id":"marathayancha-itihaas-khand-2-peshwai-by-dr-jaysingrao-pawar-मराठयांचा-इतिहास-खंड-2-पेशवाई","title":"Marathayancha Itihaas Khand 2 Peshwai By Dr. Jaysingrao Pawar मराठयांचा इतिहास खंड 2 पेशवाई","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपेशवाईपूर्व कालखंडापासून ते मराठेशाहीच्या अस्तापर्यंतच्या कालखंडावर प्रकाश टाकणारा हा खंड आहे. बाळाजी विश्वनाथचा मराठेशाहीत प्रवेश, शाहूमहाराजांशी असलेले त्याचे संबंध, त्याला मिळालेली पेशवाईची वस्त्रे, त्याचं कर्तृत्व, बाळाजी विश्वनाथ ते दुसरा बाजीराव असा पेशवाईच्या उदयापासून ते अस्तापर्यंतचा प्रवास या खंडात अंतर्भूत केला आहे. त्या-त्या पेशव्याची कामगिरी, त्यांच्या कारकिर्दीतील राजकीय परिस्थिती, त्यांनी लढलेल्या लढाया, पेशवे-छत्रपती संबंध, पेशवाईतील अंतर्गत लाथाळ्या, पानिपतचे युद्ध, बारभाईचे कारस्थान, इंग्रजांशी वेळोवेळी झालेल्या लढाया, झालेले तह, महादजी शिंदे यांचे कर्तृत्व, त्यांनी इंग्रजांशी दिलेला निकराचा लढा, उत्तरेत स्वत:चा निर्माण केलेला दबदबा, होळकरांचा पराक्रम आणि प्रसंगी स्वामिनिष्ठेला फासलेला हरताळ, दिल्लीतील बादशहांभोवती फिरणारं राजकारण इ. जवळजवळ शंभर-सव्वाशे वर्षांचा इतिहास या खंडातून सलगतेने, अभ्यासपूर्णतेने आणि ससंदर्भ उलगडला आहे. तर शंभर-सव्वाशे वर्षांच्या इतिहासाचा हा दस्तावेज अभ्यासकांसाठी, संशोधकांसाठी तर उपयुक्त आहेच; पण सर्वसामान्य वाचकांनाही आवडेल असा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Dr. Jaysingrao Pawar","offer_id":49893356929322,"sku":null,"price":585.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/peshwai.png?v=1738061294","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/marathayancha-itihaas-khand-2-peshwai-by-dr-jaysingrao-pawar-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%96%e0%a4%82%e0%a4%a1-2-%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%88","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}