{"product_id":"marathi-gaulan-मराठी-गौळण-by-ramchandra-dhekhane","title":"MARATHI GAULAN मराठी गौळण by Ramchandra dhekhane","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eगोकुळातील श्रीकृष्णाच्या लीला काव्यातून सांगणारा गौळण हा लोकप्रिय वाङ्मयप्रकार आहे. लोकसाहित्यातील गौळणींचे दालन भक्तिभाव व शृंगाररसाने सजलेले आहे. संतांच्या गौळणींमध्ये गोपिकांचे श्रीकृष्णावरील प्रेमाचे आध्यात्मिक रूप दिसते, तर शाहिरांच्या गौळणींमध्ये लौकिक शृंगारभाव व्यक्त झाला आहे. ‘कशी जाऊ मी वृंदावना\/ मुरली वाजवितो कान्हा’ (संत एकनाथ) अशा भक्ती व प्रेम या रसांनी ओथंबलेल्या गौळणी संतांनी लिहिल्या; तर ‘सोळा हजारात देखणी\/ चांद दिसे जणू दर्पणी\/ मीच एक राधा गवळ्याची\/ आगे साजणी…(पठ्ठे बापूराव) अशा शृंगार व प्रेमरसांनी युक्त गौळणी शाहिरांनी लिहिल्या. दोन्ही प्रकार वाङ्मयात अमर ठरले आहेत, दोन्हींना रसिकमान्यता मिळाली आहे. भक्ती, प्रेम, अध्यात्म व शृंगार एकत्र गुंफणाऱ्या व पिढ्यानपिढ्या लोकमनावर राज्य करणाऱ्या या लोककलेवर संशोधन करून तिचे रसाळ रूप डॉ. रामचंद्र देखणे यांनी या पुस्तकातून समोर आणले आहे.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vishwakarma Publications \/ Marathi","offer_id":49625701744938,"sku":null,"price":359.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Gaulan_cover_F-300x463_afc33bed-51f1-4f69-8609-a96fbfdea275.jpg?v=1732609554","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/marathi-gaulan-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a5%8c%e0%a4%b3%e0%a4%a3-by-ramchandra-dhekhane","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}