{"product_id":"margi-ani-deshi-by-shridhar-nalini-shantaram-tlave-naik-मार्गी-आणि-देशी","title":"Margi Ani Deshi  By Shridhar Nalini Shantaram Tlave Naik मार्गी आणि देशी","description":"\u003cp\u003eShridhar Nalini Shantaram Tilve Naik  (श्रीधर नलिनी शांताराम तिळवे नाईक) : Margi Ani Deshi (मार्गी आणि देशी)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचौथी नवता’ हा शब्द मी नव्वदीच्या दशकात ऐकलेला. ह्या शब्दाची एकदम भूल पडलेली. ह्या\u003cbr\u003eशब्दाचे प्रणेते होते दस्तुरखुद श्रीधर तिळवे. श्रीधरचे नाव ऐकून होतो. कविता, समीक्षा, सिनेमा,\u003cbr\u003eचित्रकला, फिल्मबाजी, भविष्य पाहणे इत्यादी त्याचे अनेक पैलूही ऐकिवात होते. त्याच्या\u003cbr\u003eवेगळ्या कवितेचाही दबदबा होता. आम्ही गावकोपच्यातली माणसं, कवितेत लुडबुड करत\u003cbr\u003eअसलेली. अशातच हा ‘चौथी नवता’ शब्द अलवारपणे कानावर पडलेला व खळबळ सुरू\u003cbr\u003eझालेली. हे चौथ्या नवतेचे काय गौडबंगाल आहे, हे समजायला मार्ग नव्हता; मात्र ह्याची जोरदार\u003cbr\u003eचर्चा सुरू झालेली. श्रीधरने त्याची बाजू ठाम मांडलेली व त्यासोबत ‘चिन्ह संस्कृती’ हासुद्धा एक\u003cbr\u003eअद्भुत बाण मराठी कवींवर सोडलेला. आता कविता तर लिहिलेल्या आहेत; पण त्या ‘चौथी’\u003cbr\u003eआहेत की नाही, ह्याचा एक जोरदार पेच आम्हा गावगल्लीतल्या कवींपुढे निर्माण होताना दिसू\u003cbr\u003eलागलेला ! धावता धावता एकदम थांबावे तसे काही कवींनी लिहिता लिहिता थांबा निर्माण\u003cbr\u003eकेलेला, हालत खराब झालेली, एकदम झिनझिनाट! आता आपलं काही खरे नाही असं वाटू\u003cbr\u003eलागलेलं. गावगल्लीतला एक कविमित्र म्हनला, “च्यायला, आपलं कवितेतलं करिअर संपलं.”\u003cbr\u003eचौथ्या नवतेची डाळ काही आपल्या भांड्यात शिजणार नाहीच ह्याचं दुःख त्याच्या बोलण्यातून\u003cbr\u003eटपकताना दिसलं. मी त्याला म्हनलो, “सलिम लंगडे पे मत रो।” प्राचीन कविता ते साठोत्तरी –\u003cbr\u003eसर्वांना फाट्यावर मारून आता ‘चौथी नवता’. काही कवींकडून समजून घेतले की चौथी नवता\u003cbr\u003eमंजे एकदम फ्रेश माल, मंजे पूर्वसुरीचा काहीच प्रभाव नसलेलं, भीडसे अलग, नो उचलाउचली,\u003cbr\u003eहटके, मोडलोड, लय भारी डॉट कॉम, असे काय काय ! हे एकदम जोरदार होतं. श्रीधरभायने\u003cbr\u003eबोला तो कुछ तो बात जरूर होगी! उसका मराठी कवितेमे रुतबा और हुकूम था। उसकी समीक्षा में\u003cbr\u003eभी अलग आवाज थी। जो बोलता हूँ, में वही करता हूँ। जो नहीं बोलता हूँ, वो तो डेफिनेटली\u003cbr\u003eकरता हूँ, असा बाणा ह्याची देही व ह्याची डोळा पाहणारी बरीच मंडळी होती. भाईने बोल दिया ना\u003cbr\u003eचौथी नवता, फिर खल्लास, ज्यादा आवाज नहीं करनेका। लिखनेका… वो भी ‘चौथी नवता’ में,\u003cbr\u003eनहीं तो खल्लास ! आपली तर एकदम पाचावर धारणच बसलेली. आयला, ये सब कहा से लाने\u003cbr\u003eका? इतके दिवस जे काही लिहून झालं ते मंजे एकदम फाफुगिरी की काय? श्रीधरने हंटर काढला\u003cbr\u003eहोता व त्याच्या फटकाऱ्याखाली अनेक कवी येताना दिसू लागले. आपली नेहमीची कवितेची\u003cbr\u003eभाषा बदलू लागलेले, मोडतोड करू लागलेले, अपना भी नाम ये चौथी नवता के टायटल के\u003cbr\u003eनीचे आना मंगता है, बापू असे एकमेकांना सुचवू लागलेले, तू चौथ्या नवतेत नाही? मंजे\u003cbr\u003eकायतरी तुझा केमिकल लोचा आहे रे गड्या, असे वाटू लागलेले. भायने बोल दिया, ये चौथे\u003cbr\u003eनवतेमे ये कवी है। बोल तू क्या बोलता है? आपन तर झाटूक माटूक काय बोलनार? हा भाय,\u003cbr\u003eआप एकदम सही है। मुरलीधरने तिसरा टाकावा तसा हा कवी ‘चौथी नवता’ टाकतो मनून आपून\u003cbr\u003eमान डोलावलेली. क्या डाला है चौथा! एकदम सामनेवाला तो क्लीन बोल्ड !\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Popular Prakashan \/ Shridhar Nalini Shantaram Tlave Naik","offer_id":51276988481834,"sku":null,"price":900.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/MargiAniDeshiByShridharNaliniShantaramTlaveNaik.webp?v=1774008241","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/margi-ani-deshi-by-shridhar-nalini-shantaram-tlave-naik-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}