{"product_id":"marubhumitun-baher-मरुभूमीतून-बाहेर-author-dr-shrinivas-sathe-डॉ-श्रीनिवास-साठे","title":"Marubhumitun Baher|मरुभूमीतून बाहेर Author: Dr. Shrinivas Sathe|डॉ. श्रीनिवास साठे","description":"\u003cp\u003eआपली जन्मभूमी सोडून अन्यत्र जाऊन तेथेच स्थायिक होण्याची प्रक्रिया ही मनुष्यसमाजात फार पूर्वीपासून चालू आहे. ही प्रक्रिया म्हणजे सामाजिक-सांस्कृतिक स्थलांतराची व मानवजातीची कहाणी आहे. आज स्थलांतर ही एक विद्याशाखा आहे. जैन धर्म,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eत्याचा उगम,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eप्रसार व जैनांचे स्थलांतर - यांबाबतची चर्चा येथे केली आहे. राजस्थान-मारवाडचा पूर्व-इतिहास सांगतानाच तेथून झालेले स्थलांतर व त्याची कारणमीमांसाही लेखकाने केली आहे. ह्या ग्रंथाच्या निमित्ताने डॉ. श्रीनिवास साठे यांनी जैन उद्योगसमूहाचे संस्थापक मा. भवरलालजी जैन यांच्या घराण्याचा पूर्व-इतिहास सविस्तर सांगितला आहे. हा इतिहास मा. भवरलाल जैन यांच्या पूर्वजांच्या स्थलांतराचा,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eमारवाडी व ओसवाल श्वेतांबर जैन या समाजाची वैशिष्ट्ये सांगणारा आणि त्यांच्या व्यापार-व्यवसायाची गुणवैशिष्टये स्पष्ट करणारा आहे. एका दुष्काळी भागातून स्थलांतरित झालेले जैन कुटुंब जगप्रसिद्ध उद्योगपती कसे होते,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहे सांगणारा हा इतिहास केवळ जैन समाजालाच नव्हे तर सर्वांनाच प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल हे नक्की.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642178904362,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Marubhoomitunbaher-500x500_539d4271-519e-4e2d-be7c-aadb4c56c385.jpg?v=1732966997","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/marubhumitun-baher-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%b0-author-dr-shrinivas-sathe-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}