{"product_id":"monsoon-jan-gan-man-by-sunil-tambe-मान्सून-जनगणमन-सुनील-तांबे","title":"Monsoon Jan Gan Man by Sunil Tambe मान्सून जनगणमन सुनील तांबे","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमान्सूस म्हणजे केवळ मौसम किंवा पर्जन्याचा प्रवास नव्हे. भूगोल आणि हवामानशास्त्राच्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपलिकडे त्याला वैश्विक सांस्कृतीचे विलक्षण वेधक परिमाण आहे. आपल्या सामाजिक नव्हे, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eतर कृषी आर्थशास्त्राबरोबर रजकीय संदर्भही त्याला आहेत. हजारो वर्षे विविध ओळखी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअसलेल्या जनसमूहांचे संमीलन, संघर्ष आणि स्पर्धेतून साकारलेलंसहजीवन हा या मान्सूनचा \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपरिणाम आहे. दक्षिण आशिया म्हणजे पाकिस्तान, भारत, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहे सर्व देश मिळून एक राष्ट्र बनतं असं मान्सून सांगतो. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eयुरोप-अमेरिका ते चीन-जपान या देशांना दक्षिण आशियाचं आकर्षण वाटण्यामागेही हाच \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमान्सून कारणीभूत आहे. तो केरळमधून विस्तारत सर्वत्र पसरला नसता, तर वास्को-द-\u003c\/span\u003e\u003cspan\u003eगामाला केरळमधल्या मसाल्याची चव कळली असती का? योरोपला मसाल्याची, अन्नाची, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eजीभेची चव समजली नसती, तर विस्तारवाद, वसाहतवाद आणि साम्राज्यवाद हे त्याचे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआविष्कार झालेच नसते. म्हणजेच जगाची नवी मांडणी झालीच नसती. ती मान्सूनमुळे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eघडली. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअशा या इतिहासाचे आणि भौगोलिकाचे भान जपत सुनील तांबे यांनी सिद्ध केलेला हा ग्रंथ \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअभ्यासपूर्ण आणि वाचनीय झालेला आहे. या ग्रंथातून केवळ मान्सूनचेच नव्हे, तर \u003c\/span\u003e\u003cspan\u003e‘सिव्हिलायझेशन मार्च’ कसा होत होता याचे दर्शन घडते. तांबे यांच्या चित्तवेधक आणि \u003c\/span\u003e\u003cspan\u003eशैलीदार मांडणीमुळे हे पुस्तक वाचकाला एका वेगळ्याच मान्सूनची अनुभूती देईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Sunil Tambe","offer_id":50894100398378,"sku":null,"price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/MonsoonJanGanManbySunilTambe.jpg?v=1764400013","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/monsoon-jan-gan-man-by-sunil-tambe-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}