{"product_id":"nakarlela-by-vilas-manohar-नाकारलेला-विलास-मनोहर","title":"Nakarlela by Vilas Manohar नाकारलेला - विलास मनोहर","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींची स्थिती-मनःस्थिती कशी होती आणि सध्या कशी आहे?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविलास मनोहर यांनी त्यांच्या ‘एका नक्षलवाद्याचा जन्म’ या गाजलेल्या कादंबरीतून १९७५ ते १९९० दरम्यानच्या पंधरा वर्षांच्या काळातील या नक्षलप्रवण भागातील आदिवासींच्या स्थिती-मनःस्थितीचं जिवंत चित्रण केलं. त्या कादंबरीचा ‘सीक्वेल’ अर्थात, पुढील भाग म्हणजे सदर कादंबरी ‘नाकारलेला’.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया कादंबरीतून लेखकाने पुढे १९९० च्या दशकापासून तेथील परिस्थितीत आणि नव्या पिढीच्या आदिवासींमध्ये अनेक बदल कसे घडत गेले, त्याचा वेध ‘आदिवासी-केंद्री’ दृष्टिकोनातून घेतला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक स्वतः दीर्घकाळ याच भागात वास्तव्यास असल्याने त्यांनी केलेलं समीप चित्रण विश्वासार्ह ठरतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकीकडे, शासनाची विकासाबाबतची बदलती धोरणं आणि दुसरीकडे, नक्षलवाद्यांनी स्वीकारलेली लढाऊ नीती आणि या प्रक्रियेत सुरक्षादल व नक्षलवादी यांच्यामध्ये सापडलेल्या आणि सतत शकाग्रस्त, भयग्रस्त वातावरणात जगणाऱ्या सामान्य आदिवासींच्या जीवनाचं प्रत्ययकारी चित्रण यात साधलेलं आहे. आज ग्रामसेवक, शिक्षक, प्राध्यापक, पोलीस, जवान म्हणूनही भूमिका बजावणारे आदिवासी; खबरे, सावकार, पत्रकार; राजकीय नेते व ‘नक्षल दला’चे नेते आणि मूळ इथलाच पण मोठ्या शहरात सुस्थित जीवन जगणारा आधुनिक नायक लालसू अशा अनेक व्यक्तिरेखांच्या नजरेतून वस्तुस्थितीचं ३६० अंशात दर्शन घडवू पाहणारी कादंबरी “नाकारलेला\"\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Vilas Manohar","offer_id":49766539624746,"sku":null,"price":515.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Nakarlela-Cover.jpg?v=1735223983","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/nakarlela-by-vilas-manohar-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}