{"product_id":"nakshatraनक्षत्र","title":"Nakshatra(नक्षत्र)","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eप्रा. रमेश कोटस्थाने हे नाव नाट्यक्षेत्रातील जाणत्या प्रेक्षक-समीक्षक रसिकांना चांगले परिचित आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eअर्ध्या शतकाहूनही अधिक काळ त्यांनी नाटक, एकांकिका, नभोनाट्य, एकपात्री प्रयोग, बालनाटिका, नाट्यछटा आदी विविध प्रकार सातत्याने लिहून हे नाव केलेले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eअनेकविध स्थानिक ते राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्यांच्या कलाकृती कितीतरी संघांनी सादर केल्या आहेत, अजूनही करीत आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eपुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक, कुमार कला केंद्राचे `सवाई लेखक` हे गौरवचिन्ह, साहित्य संघाचा `डॉ. भालेराव` पुरस्कार व लेखनाची अनेक प्रथम पारितोषिके या नावाला सार्थ करीत आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eबंधमुक्त, वानप्रस्थाश्रम, संगीत समिति स्वयंवर, ओनामा, कोsहम् या मूळ एकांकिका. त्यांच्यातून हे नवीन, दोन अंकी- तीन नाटकात रूपांतर!\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eराज्य स्पर्धेसाठी नाटक हवे म्हणून सुधाकर निसळ, सदाशिव अमरापूरकर, यादव खैरनार, प्रशांत हिरे आदी अनेक निशाचर मंडळी पछाडून टाकीत. या साऱ्यांची `धून-लगन` अशी किमयागार होती की लेखकाच्या शब्दांना रंग-रूप आले, संजीवन लाभले. त्यांच्या स्मरण-दिव्यांच्या प्रभेनेच हे नाट्य-त्रयीचे नक्षत्र झळकतेय…\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"product_meta\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Prakashan \/ Marathi","offer_id":49626197819690,"sku":null,"price":324.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/nakshatra1_ae699a6c-78ef-44d0-8a10-0f94f56ba990.jpg?v=1732615132","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/nakshatra%e0%a4%a8%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}