{"product_id":"narsinhavlokan-by-vinay-sitapati-translated-by-avdhoot-dongare","title":"Narsinhavlokan By Vinay Sitapati Translated By Avdhoot Dongare","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eपी.व्ही . नरसिंह राव अनपेक्षितरीत्या १ ९९ १ साली भारताचे पंतप्रधान झाले , तेव्हा त्यांच्याकडे आर्थिक संकटात पडलेल्या व हिंसक आंदोलनांनी ग्रस्त झालेल्या देशाची सूत्रं आली . त्यांचा पक्षही तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवत नव्हता.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eसंसदेत त्यांचा पक्ष अल्पमतात होता , शिवाय त्यांना ‘१० , जनपथ ‘ च्या सावलीत सत्ता चालवावी लागत होती . आणि तरीही राव यांनी भारताला देशात व परदेशात नवी ओळख मिळवून दिली . जगातील मोजक्याच नेत्यांनी इतकी कमी सत्ता असताना इतका मोठा बदल घडवून आणलेला दिसतो.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eराव यांच्या यापूर्वी कधीच प्रकाशात न आलेल्या खाजगी कागदपत्रांचा अभ्यास करून आणि शंभरहून अधिक मुलाखती घेऊन विनय सीतापती यांनी हे चरित्र लिहिलं आहे . भारतीय अर्थव्यवस्था , आण्विक कार्यक्रम , परराष्ट्र धोरण व बाबरी मशीद अशा विविध मुद्द्यांवर या चरित्रातून नव्याने प्रकाश टाकण्यात आला आहे . तेलंगणातील एका गावातून केंद्रीय सत्तेपर्यंतचा आणि तिथून पुन्हा अपमानित निवृत्तीपर्यंतचा राव यांचा जीवनप्रवास रेखाटताना ,या पुस्तकात त्यांच्या आंतरिक खळबळीचीही दखल घेण्यात आली आहे . त्यांचं तणावदायक बालपण , त्यांचे भ्रष्ट व्यवहार व प्रेमसंबंध, त्यांचा सततचा एकाकीपणा यांचीही नोंद हे पुस्तक घेतं.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eएका प्रतिभाशाली राजनीतीज्ञाची अकथित कहाणी…\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eनरसिंहावलोकन!\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ New \/ Marathi","offer_id":49653536260394,"sku":null,"price":338.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/download_57ad1ec9-ee00-47c1-8def-91caf119f26f.jpg?v=1733155965","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/narsinhavlokan-by-vinay-sitapati-translated-by-avdhoot-dongare","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}