{"product_id":"navya-avkashatil-anandyatra-नव्या-अवकाशातील-आनंदयात्रा-author-sanjay-arvikar-संजय-आर्वीकर","title":"Navya Avkashatil Anandyatra | नव्या अवकाशातील आनंदयात्रा Author: Sanjay Arvikar | संजय आर्वीकर","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eप्रस्तुत पुस्तकात संजय आर्वीकर यांनी महेश एलकुंचवार,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eना.धों.महानोर,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eकमल देसाई ह्या प्रतिभासंपन्न साहित्यिकांच्या थेटपणे घेतलेल्या सविस्तर मुलाखती आणि अरुण कोलटकर या श्रेष्ठ कवीसंबंधी घेतलेल्या सुधीर रसाळ,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eप्रकाश देशपांडे-केजकर व रवींद्र किंबहुने या समीक्षकांच्या मुलाखती समाविष्ट केलेल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eसाहित्य व साहित्यनिर्मिती यांचे केंद्रस्थान अढळ असून एका चौकस व्यासंगी सूत्रसंवादकाने साकार केलेली ही विलक्षण विचारप्रवर्तक शोधसमीक्षा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eया विस्तृत संवादसंहितेचे एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य जाणवते ते म्हणजे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसूत्रसंवादक संजय आर्वीकर यांनी चारही साहित्यिकांवरील उपलब्ध समीक्षेचाही केलेला डोळस अभ्यास.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eसृजनशील साहित्यिक,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eत्यांचे समीक्षक व स्वत: आर्वीकरांमधील सुजाण साहित्यमीमांसक अशा तीन पण एककेंद्री वर्तुळातून या मुलाखती सघन होत जातात आणि अखेर एका व्यापक ऐतिहासिक-सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात आपापल्या जागी उभ्या राहतात. साहित्याचा अभ्यास हाच संस्कृतीचाही अभ्यास असतो व ठरतो याची निर्विवादपणे तर्कशुद्ध प्रचिती देणारा हा वाङ्मयीन ऐवज आहे\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642187882794,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/NavyaAvakashatilAnandyatra-500x500_ee23c506-4392-4848-aab7-aeca16d4de2f.jpg?v=1732967224","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/navya-avkashatil-anandyatra-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%86%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be-author-sanjay-arvikar-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}